IAS Abhinav Siwach Saam Tv
बिझनेस

Success Story: ३० लाखांचा जॉब धुडकावला, सरकारी नोकरी करत दिवसरात्र अभ्यास केला, IAS अभिनव सिवाच यांची यशोगाथा

Success Story Of IAS Abhinav Siwach: आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचं काही न काही स्वप्न असते. आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनव सिवाच यांनी ३० लाख रुपये पगाराची नोकरी धुडकावली.

Siddhi Hande

प्रत्येकाचे आयुष्यात काही न काही स्वप्न असते. कधीकधी परिस्थितीनुसार आपल्याला स्वप्ने मागे सोडून दुसरं काहीतरी करावं लागतं. परंतु तरीही आयुष्यात एक संधी येते जेव्हा आपण स्वप्न पूर्ण करु शकतो. असंच काहीसं IAS अभिनव सिवाच यांच्यासोबत झालं.त्यांनी आयुष्यात आपलं स्वप्न पूर्ण केले. (Success Story Of IAS Abhinav Siwach)

३० लाख रुपये पगाराची नोकरी धुडकावली

आयएएस अभिनव सिवाच यांनी दिल्लीतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयएम कोलकत्ता येथून एमबीए पूर्ण केले. यानंतर त्यांना एका चांगल्या कंपनीत ३० लाख रुपयांची नोकरीदेखील मिळाली होती. परंतु त्यांना सिविल सर्व्हिसमध्ये काम करायचे आहे. यामुळे त्यांनी ३० लाख रुपये पगाराची नोकरी सोडून हरियाणा पब्लिक सर्विस कमीशनची परीक्षा दिली. त्यानंतर ते तहसीलदार झाले. (IAS Abhinav Siwach Success Story)

यूपीएससी परीक्षा क्रॅक

तहसीलदार झाल्यानंतर त्यांनी दिल्ली सिविल सर्विस परीक्षा दिली. त्यानंतर ते एसडीएम बनले. परंतु त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. त्यांनी शेवटी यूपीएससी परीक्षा दिली.

कुटुंब प्रशासकीय सेवेत रुजू

अभिनव हे नोकरी करत असतानाच सात ते आठ तास अभ्यास करायचे. यासाठी त्यांनी सोशल मीडियापासून दूर राहिले. अभिनव सिवाच यांचे कुटुंबच त्यांच्यासाठी प्रेरणा होी. त्यांचे वडील एक्साइज आणि टॅक्सेशन कमिशनर होते. त्यांचे काका आयएएस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच देशसेवा करायची होती.

अभिनव यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय फक्त सेल्फ स्टडीवर यूपीएससी परीक्षा पास केली. ते राज नोकरीसोबत अभ्यास करायचे. त्यांनी ऑल इंडियामध्ये १२वी रँक मिळवली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी खूप कमी वयात खूप मोठं यश मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

Sunday Horoscope : आनंदात, मौजमजा करण्यात जाणार या ३ राशींचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT