Success Story: पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; फक्त २२ व्या वर्षी IAS; सुलोचना मीना यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of Sulochana Meena : सुलोचना मीना यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनतीला पर्याय नाही. तुम्ही कोणत्याही शॉर्टकटने यश संपादन करु शकत नाही. जरी शॉर्टकटने यश मिळवलं तरीही जास्त काळ ते टिकत नाही. त्यामुळे आयुष्यात नेहमी मेहनत करावी.अशीच मेहनत सुलोचना मीना यांनी केली आणि खूप कमी वयात मोठं यश मिळवलं.

सुलोचना मीना यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. (Success Story Of IAS Sulochana Meena)

Success Story
Success Story: ९ ते ५ नोकरी, रात्रभर अभ्यास; आधी BPSC अन् नंतर UPSC क्रॅक; IAS श्वेता भारती यांची यशोगाथा वाचा

सुलोचना मीना या मूळच्या राजस्थानमधील सवाई मधुपूर येथी आदलवाडा गावच्या रहिवासी. त्या आपल्या जिल्ह्यातील पहिल्या महिला आयएएस ऑफिसर आहेत. त्यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली होती. यात त्यांनी ४१५ रँक मिळवली.

सुलोचना मीना या सर्वात तरुण आयएएस ऑफिसरपैकी एक आहेत. सुलोचना यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.त्यानंतरच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्या रोज वर्तमानपत्र वाचायच्या. त्यांना सर्व गोष्टींची माहिती होती. (Success Story)

Success Story
Success Story: अवघ्या २२ व्या वर्षी केली UPSC क्रॅक; IAS स्वाती मीणा आहेत तरी कोण?

सुलोचना यांनी सेल्फ स्टडी करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी युट्यूब, टेलिग्राम या अॅपवरुन अनेक माहिती मिळवली. याचसोबत टेस्ट सीरीजवर लक्ष दिले. याचसोबत वेगवेगळी पुस्तके वाचली. त्यानंतर मॉक टेस्ट दिल्या. त्या रोज ८ ते ९ तास अभ्यास करायच्या.

Success Story
Success Story: डॉक्टर झाली, सरकारी नोकरी सोडली; आज शेवग्याच्या शेंगांपासून कमावतेय कोट्यवधी रुपये; कोण आहे कामिनी सिंग?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com