Badlapur News Saam Tv
बिझनेस

Badlapur News: गृहिणी ते बिझनेसमॅन! ५ एकरात केला शेतीचा अनोखा प्रयोग प्रयोग; आंब्यापासून ते काजूपर्यंत लागवड; लाखोंचा नफा

Success Story of Badlapur Housewife To Successful Farmer: बदलापूरजवळील एका गृहिणीने ५ एकर शेतीत मिश्र शेतीचा प्रयोग केला आहे. त्यांनी १०० आंब्याची झाडे लावली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकजण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. गृहिणी ते बिझनेसमॅन प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी धडपड करत असतात. दरम्यान, अनेकजण गृहिणींना कमी समजत असतात. मात्र, काही गृहिणी स्वतः च्या हिंमतीवर काहीतरी करत असतात. घरच्या घरी लघुउद्योग असो किंवा शेती प्रत्येक गोष्टीत त्या नाव कमावतात. असंच काहीसं बदलापुरजवळच्या दर्शना दामले यांनी केलं आहे.त्यांनी ५ एकरात मिश्र शेतीचा प्रयोग केला आणि यशस्वी झाला.

बदलापूरजवळच्या जांभिळघरमध्ये दर्शना दामले या गृहिणीने 5 एकरात मिश्र शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. त्यांनी आपल्या शेतीत आंबा, काजू, फणस, नारळ अशा फळबागेसोबत भाजीपाला आणि पशुपालन केलंय. मिश्र शेतीमुळे शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मोकळा झालाय.

दर्शना दामले यांची बदलापूरजवळच्या जांभिळघरमध्ये 5 एकर जागा आहे. या जागेत त्यांनी सर्वात आधी आंब्यांच्या झाडांची लागवड केली. दापोली कृषी विद्यापीठातून 100 आंब्याची झाडं आणून लावली.

आजच्या घडीला त्यांना प्रत्येक झाडापासून किमान 500 ते 600 फळांचं उत्पादन मिळतं. याच पद्धतीनं त्यांनी आपल्या फळबागेत नारळ, काजू, फणस, चिक्कू, केळी तसेच इतर झाडं लावली आहेत. फळबागेतील नारळांपासून त्या घरच्या घरीच तेल बनवतात. त्यांनी 30 गुंठ्यात भातशेती तर 20 गुंठ्यात भाजीपाल्याचं उत्पादन घेतलंय. याशिवाय शेतीला कुक्कुटपालन आणि पशुपालनाची जोड दिलीय. त्यांच्याजवळ 10 गीर गायी आणि 5 ते 6 म्हशी आहेत.

पशुधनामुळे फळबागेसाठी लागणाऱ्या शेणखताची तिथेच उपलब्धता झालीय. त्यांच्या च्या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पूर्णपणे सेंद्रीय शेतीवर भर दिलाय. त्या आपल्या शेतीत शेणखत, गोमूत्र, झाडांचा पालापाचोळा तसच गांडुळखताचाच वापर करतात. याशिवाय 5 केव्हीचा सोलार प्लँट उभारल्यामुळे वीजबिलावर होणाऱ्या खर्चात मोठी कपात झालीय.

केवळ शेतीपुरताच मर्यादित न राहता दामले यांनी यशस्विनी महिला स्वयं सहाय्यता गटामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकारही घेतलाय. नापिकी, वाढता उत्पादन खर्च यामुळे तरूण वर्ग शेतीपासून दूर जातोय. अशातच दर्शना दामलेंसारख्या गृहिणीनं मिश्रशेतीच्या माध्यमातून साधलेला विकास निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांचा आदर्श इतरांनीही घेतल्यास शेती करणं अधिक सुकर होईल आणि शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT