Success Story : १९ व्या वर्षी IFS सोबत लग्न, सासरचा जाच, पतीपासून विभक्त; बिहारच्या पहिल्या महिला IPS चा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IPS Manjari Jaruhar: मंजरी जरुहार या बिहारच्या पहिल्या आयपीएस अधिकारी होत्या. त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. अनेकदा काही कारणांमुळे स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु आयुष्यात एकदा तरी अशी परिस्थिती येते की जेव्हा आपण आपले स्वप्न, इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी करु शकतो. आता या संधीचं सोनं कसं करायचं हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात असतं. आयुष्यात प्रत्येकाला एकतरी संधी देतं, असं म्हणतात. अशीच संधी मंजरी जरुहर यांना मिळाली. त्यांनी प्रशासकीय सेवेत अनेक वर्षे काम केले. (Success Story)

Success Story
Success Story: रिझर्व्ह बँकेतील नोकरी सांभाळून केली UPSC ची तयारी; चौथ्या प्रयत्नात यश; IAS यशनी नागराजन यांची यशोगाथा वाचा

मंजली जरुहर या बिहारच्या पहिल्या आयपीएस अधिकारी होत्या. त्यांनी खूप प्रयत्न करुन हे यश मिळवलं. त्यांच्या कुटुंबातील अनेकजण आयएएस आणि आयपीएस अधिकारी होते. परंतु मंजरी यांनी पुढे जाऊन चांगले गृहिणी व्हावे, असं त्यांच्या कुटुंबियांना वाटत होतं. (Success Story Of IPS Manjari Jaruhar)

मंजरी यांचे वयाच्या १९ व्या वर्षीच झाले. त्यांचे पती आयएफएस अधिकारी होती. सासरी मंजरी यांना खूप काही सहन करावे. त्यामुळेत ते आणि त्यांचे पती विभक्त झाले. पतीपासून वेगळे झाल्यानंतर त्यांचे कुटुंबिय त्यांना दुसरे लग्न करण्यासाठी सांगत होते. मात्र, त्यांनी आपले निर्णय स्वतः घेण्यास सुरुवात केले. त्यांनी पटना वूमन कॉलेजमधून इंग्लिशमध्ये ऑनर्स पदवी मिळवली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केले. याचसोबत स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

Success Story
Sport Success Story: जिद्द, मेहनतीनं मिळतं यश; वाचा, स्क्वॉश खेळात फिनिक्ससारखी उंच भरारी घेणाऱ्या वसुंधरा नांगरेची कहाणी

त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले. मंजरी यांनी पहिल्या प्रयत्नात प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा पास केली. परंतु इंटरव्ह्यूमध्ये त्या फेल झाल्या. १९७६ मध्ये यूपीएससी क्रॅक करुन बिहारच्या पहिल्या तर देशातील ५ व्या महिला आयपीएस अधिकारी बनल्या.आयपीएस झाल्यानंतर पहिली पोस्टिंग एएसपी असते. परंतु मंजरी यांनी सीआयडीमध्ये एएसपी बनवण्यात आहे. हा एक डेस्क जॉब होता. परंतु त्यांना फिल्ड पोस्टिंगवर काम करायचे होते. त्यानंतर एका अधिकाऱ्यांनी त्यांची फाइल पुढे दिली आणि त्यांना स्वतः ला सिद्ध करण्याची संधी मिळाली.

Success Story
Success Story: बिश्नोई समाजाच्या पहिल्या IAS अधिकारी; तिसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; परी बिश्नोई यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com