IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस शिवदीप लांडे यांनी अचानक दिला राजीनामा; फेसबुकवर पोस्ट करत सांगितलं कारण

IPS Shivdeep Lande latest News : आयपीएस शिवदीप लांडे यांनी अचानक त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. लांडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत राजीनाम्याचं कारण सांगितलं आहे.
आयपीएस शिवदीप लांडे
IPS Shivdeep Lande Resign Saam tv
Published On

मुंबई : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी अचानक त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत:च्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट लिहित पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याने शासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आयपीएस शिवदीप लांडे
IPS Shivdeep Lande ResignSaam tv

शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याने शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत राजीनामा दिल्याची माहिती दिली. शिवदीप लांडे म्हणाले, 'प्रिय बिहार, मागील १८ वर्षांपासून सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा दिल्यानंतर आज राजीनामा दिला आहे. या कार्यकाळात मी कुटुंबापेक्षा बिहारची सेवा करण्यास प्राधान्य दिलं. सेवा करताना काही त्रुटी राहिल्यास मी क्षमा मागतो'.

'मी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतरही बिहारमध्ये राहील. यापुढेही बिहार माझी कर्मभूमी राहील. जय हिंद, असं त्यांनी पुढे म्हटलं.

आयपीएस शिवदीप लांडे
Sundeep Waslekar on War: 'ते क्षेपणास्त्र चुकून सुटलं तर 15 ते 20 तासांत अख्खं जग नष्ट होईल'

दरम्यान, शिवदीप लांडे हे पूर्णियाचे आयजी होते. पूर्णिया आयजी शिवदीप लांडे यांनी ई-मेल करून सरकारला राजीनामा पाठवला आहे. शिवदीप यांचा राजीनामा मंजूर करण्यास काही वेळ लागू शकतो. शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे.

आयपीएस शिवदीप लांडे
Madhya Pradesh Jabalpur Accident : भीषण! भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे हे बिहारमध्ये काय करणार,हे स्पष्ट केलेले नाही. लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ते बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. बिहारमध्ये 'सिंघम' सारखी प्रतिमा निर्माण करणारे लांडे हे भारतीय जनता पक्ष किंवा जन सुराज पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात. मात्र, या चर्चांवर त्यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही.

शिवदीप लांडे यांनी २ आठवड्यापूर्वी पूर्णियामध्ये आयजी म्हणून मोठी कामगिरी पार पाडली होती. त्यानंतर अचानक राजीनामा दिल्याने अनेक जण आश्चर्यचकीत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनी राजीनामा दिला होता. त्यांनीही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला होता.

आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहारमधील अनेक जिल्ह्यात एसपी म्हणून सेवा दिली आहे. पटना, अररिया, मुंगेर आणि पूर्णिया या शहराची पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com