Madhya Pradesh Jabalpur Accident : भीषण! भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू

Madhya Pradesh Jabalpur Accident update : मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
भीषण! भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू
Madhya Pradesh Jabalpur Accident : Saam tv
Published On

Madhya pradesh jabalpur Accident : मध्य प्रदेशमधून भीषण अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बुधवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेने मृत व्यक्तींच्या गावावर शोककळा पसरली आहे.

मध्य प्रदेशच्या जबलपूर मझगवा पोलीस स्टेशन हद्दीत ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली रिक्षा जबलपूरला निघाली होती. त्याचवेळी रस्त्यात ट्रक आणि रिक्षाची धडक झाली. यानंतर भरधाव ट्रक हा प्रवाशांनी भरलेल्या रिक्षावर उलटला. त्यानंतर झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत मृतांच्या नातेवाईकांचा अश्रूंचा बांध फुटला.

भीषण! भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू
Raigad Accident: बाईकने ट्रिपल सीट करत होते प्रवास, भरधाव स्कूलबसने दिली धडक, तिघांचा जागीच मृत्यू; VIDEO आला समोर

या अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातातील मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तर या अपघातात १० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ६ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.

भीषण अपघातात मृत्यूमुखी असलेले लोक प्रतापपूरमध्ये राहणारे होते. या अपघातानंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन-दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

भीषण! भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू
Sameer Khan Accident: मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, ICU मध्ये उपचार सुरु

रस्ता दुर्घटना निधीतून १५-१५ हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. आमदार निधीतून ५-५ हजार रुपयांची तातडीने मदत जाहीर करण्यात आली आहे. या संबल योजनेतून या मृतांच्या नातेवाईकांना ४-४ लाख रुपये वेगळे दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून अपघातातील जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com