मध्य प्रदेशातील मोहन यादव सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाला. मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 28 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात ज्या लोकांनी शपथ घेतली त्यापैकी बहुतेक नवीन चेहरे आहेत. या मंत्रिमंडळात मागील शिवराज सरकारमधील केवळ 6 मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे.
मागील शिवराज सरकारमधील 10 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. यासोबतच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पमधील 3 आमदारांना मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले आहे. तर मागील सरकारमध्ये 7 शिंदे समर्थक आमदारांना मंत्री करण्यात आले होते. अशा परिस्थितीत नवीन मंत्रिमंडळात शिंदे आणि शिवराज यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मध्य प्रदेशातील मोहन यादव सरकारमध्ये एकूण 28 मंत्र्यांपैकी फक्त 6 माजी मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. मागील सरकारच्या ज्या मंत्र्यांची नावे या मंत्रिमंडळात नाहीत त्यात गोपाल भार्गव, उषा ठाकूर, मीना सिंग, हरदीप सिंग डांग, ब्रिजेंद्र प्रताप सिंग, भूपेंद्र सिंग, प्रभुराम चौधरी, ओमप्रकाश सखलेचा, ब्रिजेंद्र सिंह यादव, बिसाहू लाल यांच्या नावांचा समावेश आहे. आहे. (Latest Marathi News)
यासोबतच शिंदे समर्थकांमध्ये प्रद्युम्न सिंह तोमर आणि तुलसीराम सिलावत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शिवराज यांच्यासोबतच मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळातही शिंदेचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, 2020 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये सामील झाल्यानंतर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आले. यानंतर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मध्य प्रदेशात सत्ता स्थापन केली.
शिवराज सिंह चौहान यांच्यावर भाजपने पुन्हा विश्वास दाखवला आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. मात्र 2023 च्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर शिवराज यांच्याऐवजी डॉ.मोहन यादव यांना मुख्यमंत्री केले. आता शिवराज सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.