MP Cabinet Expansion
MP Cabinet ExpansionANI

MP Cabinet Expansion: मध्य प्रदेशच्या नव्या मंत्र्यांची यादी आली समोर; मोहन यादव सरकारच्या कॅबिनेटमध्ये कोण-कोण?

Madhya Pradesh Cabinet Expansion in Marathi: मध्य प्रदेशमध्ये अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी २५ डिसेंबर रोजी पार पडला. राज्यपाल मंगू भाई पटेल यांनी मध्य प्रदेशच्या एकूण २८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली.
Published on

Madhya Pradesh Cabinet Expansion:

मध्य प्रदेशमध्ये अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी २५ डिसेंबर रोजी पार पडला. राज्यपाल मंगू भाई पटेल यांनी मध्य प्रदेशच्या एकूण २८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. मोहन यादव यांच्या सरकारमध्ये १८ मंत्र्यांचा सामावेश झाला आहे. ६ आमदारांना राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) बनविण्यात आलं आहे. तर ४ आमदारांना राज्यमंत्री करण्यात आलं आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर आमदारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केल्याचाही दिसून आलं. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशमधील सरकारच्या शपधविधी कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्य प्रदेश भाजप प्रदेश वीडी शर्मा तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमासाठी राजभवनाच्या बाहेरही आमदारांचे समर्थकांनी एकच गर्दी केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


MP Cabinet Expansion
Corona in India: काळजी घ्या! देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णात तिप्पट वाढ, ६ राज्यातील रुग्णांची आकडेवारी चिंताजनक

मोहन यादव सरकारच्या मंत्रिमंडळात प्रदुम्न सिंह, तुलसी सिलावट, एदल सिंह कसाना, नारायण सिंह कुशवाहा,विजय शाह, राकेश सिंह, प्रल्हाद पटेल, कैलास विजयवर्गीय, करण सिंह वर्मा , संपतिया उईके, उदय प्रताप सिंह, निर्मला भूरिया,विश्वास सारंग, गोविंद सिंह राजपूत , इंदर सिंह परमार, नागर सिंह चौहान, चैतन्य कश्यप, राकेश शुक्ला यांचा कॅबिनेटमध्ये सामावेश करण्यात आला आहे.

MP Cabinet Expansion
Poonch Terrorist Attack: मार्चमध्ये होणार होते लग्न; तर कुणी पत्नीला दिलं होतं वचन, दहशतवाद्यांच्या हल्लानंतर सगळं संपलं

कृष्णा गौर, धर्मेंद्र लोधी, दिलीप जयस्वाल, गौतम टेटवाल, लेखन पटेल, नारायण पवार यांना राज्यमंत्रिपद (स्वतंत्र कार्यभार) देण्यात आलं आहे. तसेच राधा सिंह, प्रतिमा बागरी, दिलीप अहिरवार,नरेंद्र शिवाजी पटेल यांनी राज्यमंत्री बनविण्यात आलं आहे. सर्वात आधी कैलास विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, राव उदय प्रताप सिंह यांनी शपथ घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com