Raigad Accident: बाईकने ट्रिपल सीट करत होते प्रवास, भरधाव स्कूलबसने दिली धडक, तिघांचा जागीच मृत्यू; VIDEO आला समोर

Raigad News: रायगडमध्ये स्कूलबसने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बाईकने ट्रिपल सीट करत होते प्रवास, भरधाव स्कूलबसने दिली धडक, तिघांचा जागीच मृत्यू; VIDEO आला समोर
Raigad AccidentSaam Tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगडच्या पाली खोपोली मार्गावर हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परळीजवळ कानसळ गावाजवळ स्कूलबसने बाईकला समोरून धडक दिली. या बाईकवर तीन जण प्रवास करत होते.

बसने धडक देताच हे तिघेजण गाडीवरून फेकले गेले आणि गंभीर दुखापत होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. तिघांचे मृतदेह जांभूळपाडा प्राथमिक केंद्रात आणण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

बाईकने ट्रिपल सीट करत होते प्रवास, भरधाव स्कूलबसने दिली धडक, तिघांचा जागीच मृत्यू; VIDEO आला समोर
Shiv Sena Split: 'मला काहीतरी सांगायचंय', शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर; CM शिंदेंवर आधारित नाटकावरून राजकारण तापणार?

संपूर्ण घटना कॅमेरात कैद

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, रायगडच्या पाली खोपोली मार्गावर बस जात असताना समोरून अचानक एक बाईक येते. या बाईकला बस जोरदार धडक देताना या व्हिडिओत दिसत आहे. या बाईकवर तीनजण प्रवास करत होते. बसच्या मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केली आहे.

बसची स्टेरिंग रोड तुटल्याने बस थेट खड्ड्यात

दरम्यान, धाराशिव तालुक्यातही एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर अली आहे. येथे बसची स्टेरिंग तुटल्याने बस रोडलगतच्या खड्ड्यात जाऊन अपघात झाल्याची घटना तालुक्यातील सारोळा गावाजवळ घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

बाईकने ट्रिपल सीट करत होते प्रवास, भरधाव स्कूलबसने दिली धडक, तिघांचा जागीच मृत्यू; VIDEO आला समोर
Pune News: पुण्यात नोकरी, ४ महिन्यांतच मृत्यू; २६ वर्षीय CA तरुणीचा 'वर्क प्रेशर'मुळं मृत्यू झाल्याचा आईचा आरोप

कोंड गावाकडून धाराशिवकडे जाणारी बस क्रमांक एमएच ११ बीएल ९३५८ या गाडीचा स्टेरिंग तुटल्याने ही घटना घडली. तर या बसमध्ये ३८ प्रवाशी असल्याची माहिती समोर आली असून सर्जन सुखरूप आहेत. मात्र बसच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com