Sundeep Waslekar on War: 'ते क्षेपणास्त्र चुकून सुटलं तर 15 ते 20 तासांत अख्खं जग नष्ट होईल'

Sundeep waslekar News: आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संदीप वासलेकर यांनी युद्धाच्या शक्यतेवर मोठं भाष्य केलं आहे. डॉ. संदीप वासलेकर हे साम टीव्हीशी बोलत होते.
'ते क्षेपणास्त्र चुकून सुटलं तर 15 ते 20 तासांत अख्खं जग नष्ट होईल'
Sundeep waslekar on war Saam tv
Published On

Sundeep Waslekar on War : गेल्या काही वर्षांपासून जग रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे धुमसत आहेत. काही महिन्यांपूर्वी इराक-इराणमध्ये पुन्हा एकदा युद्ध भडकलं होतं. या युद्धाचे भयावह फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिक, नेटकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. याच सर्व युद्धाबाबत लेखक, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संदीप वासलेकर यांनी मोठं भाष्य केलं आहे. रशियाचं क्षेपणास्त्र चुकून सुटलं तर 15 ते 20 तासांत अख्खं जग नष्ट होईल, असा दावा वासलेकर यांनी केला आहे.

लेखक डॉ. संदीप वासलेकर यांनी साम टीव्हीशी बोलताना जगातील युद्धाच्या शक्यतेविषयी मोठं भाष्य केलं. 'रशियाकडे अवॉन नावाचे शस्त्र आहे. ते रडारवरही दिसत नाही, तसेच एकदा ते चुकून का होईना, पण सुटलं तर ते क्षेपणास्त्र स्वतःच स्वतः मार्ग ठरवतं. कारण ते मानवाप्रमाणे विचार करून दिशा आणि ठिकाण ठरवू शकते. त्यावर रशियाचही नियंत्रण नाही आणि अमेरिकेचंही नियंत्रण राहणार नाही. चुकीने जरी ते अणवस्त्र सुटलं. तरी 15 ते 20 तासात संपूर्ण जग नष्ट होईल. माझी 12000 वर्ष मानव संस्कृतीचा विकास होण्यासाठी लागली आहेत. बारा तासात संपूर्ण जीवसृष्टी उध्वस्त होऊ शकते. पुन्हा दहा-बारा वर्ष मानवाचा विकास व्हायला लागतील, असा दावा वासलेकर यांनी केला आहे.

'ते क्षेपणास्त्र चुकून सुटलं तर 15 ते 20 तासांत अख्खं जग नष्ट होईल'
Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

शीतयुद्धाबाबत ते म्हणाले,'स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप' अनेक देशांमध्ये सल्लागार आणि देशांतर्गत विषय सोडवण्याचं काम करतो. अनेक देशांमध्ये अंतर्गत विषय शीतयुद्ध वेगवेगळ्या देशांशी असलेले चांगले संबंध यामुळे तेव्हा आम्ही समांतर राजनीतीमध्ये प्रवेश केला. अनेक देशात देशांमध्ये वितुष्ट येतात. त्यावेळेस आम्हाला बोलावलं जातं. भारतीय म्हणून मी निष्पक्षपाती आहे, असा माझ्या बाबतही विचार केला जातो. त्यामुळे जागतिक पाठिंबाही मोठा मिळतो'.

वासलेकर त्यांच्या पुस्तकाविषयी बोलताना म्हणाले,'एका दिशेचा शोध हे पुस्तक ते 2010 साली आलं. आता त्याची 25 वी आवृत्ती आली. त्यावेळेस अण्वस्त्र स्पर्धा होती, पण ती नियंत्रणात होती. त्यावेळेस अणवस्त्र हल्ला होईल, असं कधी वाटलं नव्हतं. मात्र गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये बदल झालाय. तो युद्धाच्या प्रकारावरून त्यावेळेस पाण्यावरून युद्ध होतील, असं वाटलं होतं. पण आता देशांमध्ये पाण्यावरून वाद होणार नाही, युद्ध होणार नाहीत. मात्र त्यावेळेस अण्वस्त्राची भीती नव्हती, आता वाढली आहे. अनेक देशांच्या पाच ते सहा नोबल पारितोषिक विजेत्यांचा मी एक ग्रुप तयार केला. माझ्यासाठी ते नोर्मेंतीला झाले. त्यावेळेस आम्ही दोन पानांचा जाहीरनामा तयार केला'.

'शस्त्र स्पर्धा अशा ठिकाणी पोचली आहे की संपूर्ण मानवी सृष्टीचा संहार होऊ शकतो. यामुळे सर्वच देशाचे नोबेल पारितोषिक विजेते ग्रासलेले आहेत. दोन पानांचा जाहीरनामा करणार नाही म्हणून सर्वांनी मला पुस्तक लिहिण्याचा आग्रह केला. पण मला कामाच्या निमित्ताने संधी मिळत नव्हती. पण लॉकडाऊन नाही, ती संधी उपलब्ध करून दिली. त्यात A world without War हे पुस्तक लिहिलं. आता हे अनेक देशांच्या भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे आणि त्याची मागणी आहे. a world without war हे शक्य आहे. अनेक देशाने आदी वसाहतवाद केला होता, पण नंतर ते स्वतंत्र झाले. गुलामगिरी होती कुठेही कालांतराने बंद झाली. मानवाच्या एकूणच प्रवासामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बंद झालेल्या आहेत,असेही ते म्हणाले.

'ते क्षेपणास्त्र चुकून सुटलं तर 15 ते 20 तासांत अख्खं जग नष्ट होईल'
Russia-Ukraine War: भारत युद्ध थांबवणार? रशिया-युक्रेन युद्धावर भारत-चीनची मध्यस्थी?

'जगामध्ये मागच्या दहा वर्षात तंत्रज्ञान विज्ञान खूप पुढे गेला आहे. मानवाचा मनाचा आणि समाजाचा प्रवास चांगल्या दृष्टीने झालाय. युद्ध पण काही वर्षांनी इतिहास जमा होऊ शकतो, ते कसं करावं ते स्टेप बाय स्टेप मी या पुस्तकात ब्लू प्रिंटच्या माध्यमातून दिला आहे. पण यासाठी वीस तीस वर्षाचा काळ द्यावा लागेल. मोठ्या महायुद्धात अण्वस्त्र जैविक आणि AI तंत्रज्ञानाच्या नवीन प्रकार शास्त्रांचा वापर होऊ शकतो. अणुवस्त्र आणि AI यांचा एकत्रित वापर करून नवीन वस्त्र बनवला जाईल, त्याचा वापर होण्याची ही शक्यता आहे. मला डिरेशनच्या हातातही दिसते, ती राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com