Russia-Ukraine War: पुतीन पुन्हा आक्रमक; घातक मिसाईल आणि ड्रोन्सने युक्रेनवर केला हल्ला

Russia- Ukraine War:काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियावर आघाडीचा दावा केला होता.रशियाच्या ताब्यात असलेले क्षेत्रे परत घेतली असल्याचा दावा युक्रनेने केला होता. तर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा युक्रेन दौरा केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रशिया आक्रमक झाला असून पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला केलाय.
Russia- Ukraine War: पुतीन पुन्हा आक्रमक;  घातक मिसाइल आणि ड्रोन्सने युक्रेनवर केला हल्ला
Russia- Ukraine War
Published On

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजून मिटताना दिसत नाहीये. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी आज सकाळी युक्रनेवर मिसाईल आणि घातक ड्रोन्सने हल्ला चढवलाय. रशियाकडून करण्यात आलेला हा हल्ला युक्रेनवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. रशियाने जमीन आणि हवाई अशा दोन्ही मार्गांनी युक्रेनवर हल्ला केलाय. या हल्ल्यांमध्ये रशियाने लोकांपेक्षा जास्त ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलं असून युक्रेनमधील अनेक शहरे अंधारात बुडाली आहेत. तेथील वीजपुरवठा बंद झालाय.

रशियाच्या सैन्याने सोमवारी युक्रेनच्या अनेक भागात ड्रोन आणि मिसाईलने हल्ला केला. हे हल्ले विशेषत: वीज प्रकल्पांवर करण्यात आलीत. या हल्ल्यांमध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेला हा हल्ला सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता. गेल्या काही आठवड्यांमधील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे दिसून येतंय. युक्रेनियन हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन ड्रोनचे अनेक समूह युक्रेनच्या पूर्व, उत्तर, दक्षिण आणि मध्य प्रदेशाकडे जात होते. त्यानंतर अनेक क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे देखील डागण्यात आलीत.

हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ड्रोन आणि मिसाईल हाणून पाडणारे शस्त्रे द्यावीत,अशी मागणी युरोपियन देशांकडे त्यांनी केलीय. रशियाने त्यांच्या देशावर घातक मिसाईल आणि ड्रोनने हल्ला केलाय. सोमवारी रशियाने युक्रेनवर १०० पेक्षा अधिक मिसाईल आणि १०० ड्रोनने हल्ला केल्याची माहिती झेलेन्स्की यांनी दिलीय. सुरक्षेसाठी आपण प्रयत्न करू शकतो. जर युरोपियन देशांच्या लढाऊ विमान, आमचे एफ -१६ आणि वायू सेनेसोबत आले तर रशियावर प्रतिहल्ला करू शकू असं झेलेन्स्की म्हणालेत.

दरम्यान झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या 33 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुतीन यांना एका व्हिडिओ पत्त्यामध्ये वृद्ध संबोधून त्यांची खिल्ली उडवली. आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या व्हिडिओमध्ये झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर निशाणा साधला होता. मॉस्कोच्या वारंवार आण्विक हल्ल्याच्या इशाऱ्यांवर टीका केली होती. त्यानंतर रशियाने युक्रेनवर हल्ला करत पुनतीनवरील विनोदाचा बदला घेतल्याचं म्हटलं जात आहे.

Russia- Ukraine War: पुतीन पुन्हा आक्रमक;  घातक मिसाइल आणि ड्रोन्सने युक्रेनवर केला हल्ला
PM Modi in Ukraine: शांततेसाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मागितला भारताचा पाठिंबा; झेलेन्स्कीच्या भेटीनंतर पीएम मोदींची मोठी घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com