PM Modi in Ukraine: शांततेसाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मागितला भारताचा पाठिंबा; झेलेन्स्कीच्या भेटीनंतर पीएम मोदींची मोठी घोषणा

Ukraine PM And PM Modi Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्धग्रस्त देश युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही देशांनी सशस्त्र संघर्ष संपवण्यासाठी शांतता पुनर्स्थापना प्रक्रियेत सामील होण्याचे आवाहन केले.
PM Modi in Ukraine: शांततेसाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मागितला भारताचा पाठिंबा;  झेलेन्स्कीच्या भेटीनंतर पीएम मोदींची मोठी घोषणा
Ukraine PM And PM Modi Meet
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनच्या दौऱ्यावर असून त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पीएम मोदींनी भारत युद्धग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यास तयार असल्याचं सांगितलं. रशिया आणि युक्रेनलाही त्यांनी शांतता पुनर्स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केलं. दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे.

दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झालीय. तसेच संपूर्ण जग दोन गटात विभागले गेलेत. अशा परिस्थितीत भारत या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार. भारताची भूमिका लोकशाही आणि शांतताप्रिय असल्याचंदेखील पंतप्रधान मोदींनी सांगितलं. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जाताहेत. मात्र दोन्ही देशांमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपत नाहीये.

एका बाजूला रशिया आहे तर दुसऱ्या बाजूला युक्रेन. झेलेन्स्की यांच्या देशाला युरोप आणि अमेरिकेचा पाठिंबा मिळतोय. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशांत प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधलंय. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केलीय. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना शांतता पुनर्स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पीएम मोदी आणि राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या भेटीची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे दोन्ही देशांच्या नेत्यांना परस्पर संवाद सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांनी संघर्ष संपवण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. सशस्त्र संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असं दोन्ही नेत्यांनी यावेळी म्हटल्याची माहिती परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिली.

पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की याच्या भेटी दरम्यान युक्रेनचे पंतप्रधान म्हणाले की, प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचे सतत सहकार्य आवश्यक आहे. यावेळी मोदी म्हणाले, युद्धात मुलांना सर्वात जास्त त्रास होतो, असे होऊ नये. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात मोठ्या प्रमाणात लोक मारले गेलेत. तसेच मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.

PM Modi in Ukraine: शांततेसाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मागितला भारताचा पाठिंबा;  झेलेन्स्कीच्या भेटीनंतर पीएम मोदींची मोठी घोषणा
Modi Government: थेट नोकर भरतीची जाहिरात रद्द; विरोधानंतर मोदी सरकारचं एक पाऊल मागे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com