S. Jaishankar in Cabinet: एस जयशंकर दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात सामील! नोकरशहा ते कॅबिनेट मंत्री; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

S. Jaishankar in India's New Cabinet: सुब्रमण्यम जयशंकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन मंत्रिमंडळात पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे.
S. Jaishankar in Cabinet: एस जयशंकर दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात सामील! नोकरशहा ते कॅबिनेट मंत्री; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
S. JaishankarSaam TV

सुब्रमण्यम जयशंकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन मंत्रिमंडळात पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.

नोकरशहापासून ते राजकारणी बनलेले जयशंकर हे गुजरातचे राज्यसभेचे खासदार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून परराष्ट्र मंत्रालयाचे नेतृत्व करणारे ते पहिले माजी परराष्ट्र सचिव आहेत.

S. Jaishankar in Cabinet: एस जयशंकर दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात सामील! नोकरशहा ते कॅबिनेट मंत्री; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
Modi Oath Ceremony LIVE: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान! नितीन गडकरी यांच्यासह या नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून भूमिका बजावली होती. एस जयशंकर यांना दुसऱ्या टर्ममध्ये ही जबाबदारी मिळाली. या काळात त्यांनी असे अनेक निर्णय घेतले जे चर्चेत राहिले. एकीकडे सत्ताधारी पक्षातील लोकांनी त्यांच्या निर्णयांचे समर्थन केले. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी जयशंकर यांच्या निर्णयांवर जोरदार टीका केली. जयशंकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या परराष्ट्र धोरणांना अनेकदा विरोध केला होता.

एस जयशंकर यांनी जानेवारी 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत परराष्ट्र सचिव म्हणून काम पाहिले. जयशंकर यांनी आपले शालेय शिक्षण एअर फोर्स स्कूल, सुब्रतो पार्क, नवी दिल्ली येथून पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) राज्यशास्त्रात एमए, एम.फिल. आणि नंतर आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय घेऊन पीएचडी केली.

S. Jaishankar in Cabinet: एस जयशंकर दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात सामील! नोकरशहा ते कॅबिनेट मंत्री; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
Cabinet Minister 2024 List: नितीन गडकरी, अमित शहा यांच्यासह या दिग्गज नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, पाहा संपूर्ण यादी

जयशंकर यांनी जपानी वंशाच्या क्योको यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलगे, ध्रुव, अर्जुन आणि एक मुलगी जिचं नाव मेधा आहे. ते 1977 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले आणि 38 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 2007 ते 2009 पर्यंत सिंगापूर, 2001 ते 2004 पर्यंत चेक प्रजासत्ताक, 2009 ते 2013 चीन आणि 2014 ते 2015 पर्यंत अमेरिकेत येथे भारतीय राजदूत म्हणून काम केले. जयशंकर यांनी भारत-अमेरिका नागरी आण्विक कराराच्या वाटाघाटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com