Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडील बस ड्रायव्हर, लेकीने क्रॅक केली UPSC; IAS प्रिती हुड्डा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Preeti Hooda: आयएएस प्रिती हुड्डा यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. दिल्ली परिवहन निगमच्या बस ड्रायव्हरच्या लेकीने हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षा देतात. यूपीएससी परीक्षेत यश मिळवायचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु खूप कमी लोकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. असंच काहीसं प्रिती हुड्डा यांच्यासोबत झालं.प्रिती हुड्डा यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या आयएएस झाल्या आहे.

प्रिती हुड्डा या मूळच्या हरियाणाच्या बहादुरगडच्या रहिवासी. त्यांनी हिंदी माध्यमातून यूपीएससी परीक्षेचा पेपर दिला. त्यानंतर इंटरव्ह्यूदेखील पास केला. त्यानंतर त्यांची आयएएस पदावर नियुक्ती झाली.

प्रिती यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली.

प्रिती यांचे वडील दिल्ली परिवहन निगममध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करायचे. त्यांच्या कमाईतून फक्त घराचा महिन्याचा खर्च निघायचा.

प्रिती हुड्डा यांचे शिक्षण (IAS Preeti Hooda Success Story)

प्रिती हुड्डा या अभ्यासात एवढ्या चांगल्या नव्हत्या. त्यांना दहावीत ७७ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर बारावीत ८७ टक्के गुण मिळवले होते. यानंतर त्यांनी दिल्लीतील लक्ष्मी बाई कॉलेजमधून हिंदीमध्ये ग्रॅज्युएशन केले. यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमधून हिंदीमध्ये एम.फिल आणि पीएचडी केली.

प्रिती हुड्डा यांनी लहानपणी कधीच सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा विचार केला नव्हता. त्यांनी जेव्हा जेएनयूमध्ये अॅडमिशन घेतले तेव्हा त्यांना यूपीएससी (UPSC) परीक्षेबद्दल समजले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

प्रिती हुड्डा यूपीएससी परीक्षेची तयारी करताना वेगळी स्ट्रॅटेजी वापरली. त्या अभ्यासासोबतच मस्तीदेखील करायची. त्या लगातार १० तास अभ्यास नाही करायच्या. त्या मध्ये मध्ये मस्ती, टीव्हीदेखील बघायाच्या. त्यांचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT