आयपीएस के.के बिश्नोई यांचा प्रवास
फ्रान्समधून मास्टर्स केले
३० लाखांच्या पगाराची नोकरी सोडली
भारतात येऊन केली UPSC परीक्षेची तयारी
यूपीएससी परीक्षा देण्यासाठी वर्षानुवर्ष दिवसरात्र मेहनत करावी लागते. यूपीएससी परीक्षेत अनेकदा अपयश येते. परंतु कितीही अपयश आले तरीही हार मानायची नसते. यूपीएससी परीक्षा ही फक्त अभ्यासापुरती मर्यादित नसून आपल्याला उत्तम माणूस बनवायलादेखील मदत करते. या परीक्षेमुळे माणसाला अपयश पचवायची ताकद मिळते. असंच काहीसं के.के बिश्नोई (कृष्ण कुमार बिश्नोई )यांच्यासोबत झालं. त्यांनी यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक १७४ प्राप्त केली.
फ्रान्समधून शिक्षण
के. के बिश्नोई यांनी २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफेंस कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. यानंतर फ्रान्सच्या पॅरिस स्कूल ऑफ इंटरनॅशमनल अफेअर्समधून मास्टर्स डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या ट्रेड सेंटरमध्ये नोकरी मिळाली होती. त्यांना ३० लाखांच्या पगाराची नोकरी होती. परंतु त्यांनी ही नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
३० लाखांच्या पगाराची नोकरी सोडली
के के बिश्नोई हे पॅरिसरला गेले होते. त्यांना फ्रान्स सरकारने स्कॉलरशिप दिली होती. त्यांनी १ वर्षापर्यंत यूएएन ट्रेड सेंटरमध्ये कामदेखील केले. परंतु त्यांचे मन देशसेवा करण्याकडे होते. त्यामुळे त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि जेएनयूमधून एम. फिल करायला तयार झाले. याचसोबत त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करुन आयपीएस पदाला गवसणी घातली आहे.
आयपीएस अंशिका यांच्याशी लग्न
आयपीएस कृष्ण कुमार बिश्नोई संभल हे आयपीएस वंशिका शर्मा यांच्यांशी लग्न करणार आहेत. त्या २०२१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.