

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
आस्था जैन यांनी प्राप्त केली ९वी रँक
आयपीएसनंतर आता आयएएस अधिकारी
नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यूपीएससी परीक्षेत अनेकांनी बाजी मारली. या परीक्षेत आस्था जैन यांनी ९वी रँक प्राप्त केली आहे.त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. खूप मेहनत, जिद्द आणि शिस्तीने त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. यूपीएससी परीक्षेने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदललं आहे.
आस्था जैन या मूळच्या उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांचे सिविल सर्व्हिसमध्ये जाऊन समाजाची सेवा करण्याचे स्वप्न होते. आस्था यांचे वडील लहान व्यापारी होते. त्यांचे किराणामालाचे दुकान आहे. आईवडिलांसाठी आस्था यांनी खूप मेहनत घेतली आणि यश मिळवले.
आस्था जैन यांनी दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शिक्षत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. याचसोबत त्यांनी कोचिंग क्लासेस, ऑनलाइन अभ्यास याची मदत घेतली. त्यांनी १२वीत बोर्डाच्या परीक्षेत देशात चौथी रँक प्राप्त केली होती. त्या खूपच हुशार होत्या.
आस्था जैन यांनी याआधीही यूपीएससी परीक्षा पास केली आहे. २०२३ मध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक १३१ मिळवली. त्यांची निवड आयपीएस पदासाठी झाली होती. त्यांची राजस्थान कॅडरमध्ये निवड झाली. त्या सध्या ट्रेनिंग करत आहेत.
आधी IPS नंतर IAS अधिकारी
आस्था या आयपीएस अधिकारी झाल्या. परंतु त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी परीक्षेची तयारी सुरु ठेवली. शेवटी त्यांना यश हे मिळालेच. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांच्या यशामुळे कुटुंबियांना खूप आनंद झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.