दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या दिवसांत आपण घराची साफसफाई करतो आणि घराला सुंदर लुक देण्यासाठी बेडवर नवीन बेडशीट किंवा बेडशीट अंथरतो. सणासुदीला घर नीटनेटके दिसण्यासाठी बेडशीट बदलणे हा सजावटीचा महत्वाचा भाग मानला जातो. परंतु, सजावटीपेक्षाही आरोग्याच्या दृष्टीने बेडशीट किती दिवसांनी बदलावी आणि जुन्या बेडशीटवर झोपल्याने काय दुष्परिणाम काय होऊ शकतात, हे समजून घेणे जाणून महत्वाचे आहे.
दररोज आपण सामान्यपणे ८ ते ९ तास बेडवर झोपतो. या काळात आपल्या शरीरावरील घाम, मृत त्वचा, शरीरावर जमा झालेले तेल आणि धुळीचे कण बेडशीटवर जमा होतात त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतात. जर बेडशीट वेळेवर बदलली नाही, तर त्या सूक्ष्म कणांवर जिवाणू, फंगस वाढतात.
बेडशीटवर जमा झालेले किटाणू, अस्वच्छ बेडशीटमुळे अंगाला खाज सुटणे, पुरळ उठणे, एक्झिमा किंवा चेहऱ्यावर पिंपल्स या समस्या वाढतात.
बेडशीटमध्ये साचलेल्या धुळीचे कण आणि डस्ट माइट्स असल्याने श्वासावाटे शरीरात गेल्याने दम्याची लक्षणे किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, घरातील बेडशीट आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त ७ ते १० दिवसांच्या आत बदलणे महत्वाचे आहे.
जर घरात लहान मुले असतील, कुत्र्या-मांजरांसारखे पाळीव प्राणी असतील किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त घाम येत असेल, तर बेडशीट दर ५ ते ६ दिवसांनी बदलणे महत्वाचे आहे.