Gold Rate Today : लक्ष्मीपूजनापूर्वी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा सोन्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k,22k,24k चे ताजे दर

Gold Silver Rate Today Update News : लक्ष्मीपूजनापूर्वी सोन्याच्या दरात ११० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,४३,५७० रुपयांवर पोहोचला आहे. जाणून घ्या १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे आजचे दर आणि चांदीचा भाव.
Gold Rate News
Gold Rate News AI Image
Published On: 

सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकजण सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानतात. मात्र, यंदा लक्ष्मीपूजनापूर्वीच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आज सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. एका तोळ्यामागे सोन्याचे दर ११० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा भाव आता १ लाख ४३ हजार ५७० रुपयांवर पोहोचला आहे. सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र आज कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा १०० ग्रॅमचा भाव २० हजार ५०० रुपये इतका कायम आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज तरी दरवाढीचा सामना करावा लागणार नाही. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. एकीकडे सणाचा उत्साह आणि दुसरीकडे वाढते सोन्याचे दर, अशा परिस्थितीत यंदाच्या लक्ष्मीपूजनाला सोने खरेदी करताना ग्राहकांना आपल्या बजेटचा विचार करावा लागणार आहे.

Gold Rate News
Old Monk : ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरु होणार? अखेर कंपनीने 'ती' अट मान्य केली

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,३५७

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१४,८५६

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४३,५७०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,३५,७००

Gold Rate News
Weather Update : हवामानात मोठे बदल! ४ राज्यांना पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कसं असेल वातावरण?

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,१६०

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०५,२८०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३१,६००

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,१६,०००

Gold Rate News
MPSC Recruitment : मोठी बातमी! MPSC च्या विद्यार्थ्यांना दिवाळी भेट; १६७१७ पदांसाठी भरती

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,७६८

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८६,१४४

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०७,६८०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,७६,८००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.