Success Story Saam tv
बिझनेस

Success Story: आधी इंजिनियरिंग; १२ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली अन् UPSC दिली; IPS सईम रजा यांचा प्रवास

Success Story of IPS Sayem Raza: आयपीएस सईम रजा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी परीक्षेसाठी १२ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली.

Siddhi Hande

IPS सईम रजा यांचा प्रेरणादायी प्रवास

१२ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली

कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक

आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी मेहनत आणि जिद्द महत्त्वाची असते. तुम्ही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवू शकतात. त्यासाठी सातत्य असायला हवे.अशीच मेहनत सईम रजा यांनी केली. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा दिली. त्यांचे आयपीएस होण्याचे स्वप्न होते.

आईवडिलांच्या सपोर्टमुळे नोकरी सोडली

सईम रजा हे मूळचे मुजफ्फरपुर येथील रहिवासी होते. त्यांचे वडील स्टेट बँकेत काम करायचे. त्यांची आई गृहिणी आहेत.सईम यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

१२ लाखांची पगाराची नोकरी सोडली

सईम यांचे सुरुवातीचे शिक्षण मुजफ्फरपुर येथे झाले. पुढे ते इंजिनियरिंग करण्यासाठी बंगळुरु येथे गेले. त्यांनी बीटेकचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. ते बंगळुरुतील एका कंपनीत डेटा सायंटिस्ट पदावर काम करत होते. त्यांना १२ लाखांचे पॅकेज होते. त्यांनी जवळपास पाच वर्ष एका कंपनीत काम केले.

कोरोनामुळे सईम हे पुन्हा आपल्या घरी परतले. ते वर्क फ्रॉम होम करतात. परंतु तरीही त्यांना या कामात समाधान मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सईम यांनी लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली. त्यांनी कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.त्यांनी २०२३ मध्ये परीक्षा दिली आणि त्यांची आयपीएस पदावर निवड झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Yoga Poses: डबल चिनमुळे चेहरा मोठा दिसतोय? मग घरीच करा रोज हे 5 फेस योगा प्रकार

Eknath Shinde : धारावीत एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; कारण काय?

Chandrapur : महापालिकेच्या बनावट शिक्क्यांचा वापर, बोगस कागदपत्राने जमिनी लाटल्या, काँग्रेसचा भाजप नेत्यावर आरोप

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक, १ तोळा सोनं दीड लाखांजवळ; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT