Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडील बस कंडक्टर, आई बीडी फॅक्टरीत काम करायची, परिस्थितीवर मात करत केली UPSC क्रॅक; IPS एस. इन्बा यांचा प्रवास

Success Story of IPS S Inba: आयपीएस इन्बा यांनी खूप कठीण परिस्थितीतून यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तरीही त्यांनी मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि परीक्षा पास केली.

Siddhi Hande

IPS एस इन्बा यांचा प्रेरणादायी प्रवास

वडील बस कंडक्टर, आई बीडी फॅक्टरीत करायची काम

कठीण परिस्थितीवर मात करत केली UPSC क्रॅक

अनेकदा आपल्याकडे खूप काही करण्याची इच्छा असते. परंतु कधीकधी परिस्थिती आपली साथ देत नाही. परिस्थितीमुळे तुम्हाला हार मानावी लागते. परंतु कधीच परिस्थितीमुळे हार मानू नका. उलट परिस्थितीवर मात करुन यशाचे दिशेने वाटचाल करा. असंच एक उदाहरण म्हणजे आयपीएस अधिकारी एस इन्बा. त्यांनी खूप खडतर परिस्थितीवर मात करत यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी देशातील तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे.

वडील बस कंडक्टर,आई बीडी फॅक्टरीत करायची काम

एस. इन्बा या मूळच्या तमिळनाडूतील तेनकासी जिल्ह्यातील सेंगोट्टई येथील रहिवासी. त्यांचे बालपण खडतर परिस्थितीत गेले. इन्बा यांची आई बीडी बनवायच्या फॅक्टरीमध्ये काम करायची. वडील श्रीनिवासन हे बस कंडक्टर आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. घरातील खर्च भागणेदेखील कठीण होते. परंतु इन्बा यांनी सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहिले होत आणि ते पूर्ण केलेच.

एस इन्बा यांच्या यशामागे त्यांच्या भावाकडून घेतलेले प्रेरणा आहेत. इन्बा यांचे भाऊ बालामुरली हे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे जास्त शिक्षण घेऊ शकले नाही. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे वडील रोजंदारीवर काम करायचे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. मीदेखील नोकरी करण्याचा विचार करत होती. परंतु माझ्या भावाने मला यूपीएससी करण्यासाठी प्रेरणा दिली. माझा खर्चदेखील माझ्या भावानेच केला.

इन्बा यांनी २०२० मध्ये कोइम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये बीई इन कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त केली. त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न होते. कॉलेज संपल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी सरकारी पब्लिक लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास केला. ऑनलाइन क्लासेस केले.

सेल्फ स्टडी आणि ऑनलाइन अभ्यास केला. त्या दोनदा अपयशी ठरल्या . परंतु त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्यांदा अपयशी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली. त्यांनी २०२४ मध्ये तिसरा अटेम्प्ट दिला. त्यांना आयएएस कॅडर नाही मिळाले. परंतु त्या आज आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर ८ सिलेंडरने भरलेल्या टेम्पोने घेतला पेट

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

Sheet Mask : तुम्ही चेहऱ्यावर शीट मास्क लावता? मग 'हे' ५ टॉप फायदे जाणून घ्या

Crime News : २ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं आयुष्य संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकरण

SCROLL FOR NEXT