Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: विदेशात शिक्षण, लाखो रूपयांची नोकरी सोडली अन् झाला IPS, अमित जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Amrit Jain: आयपीएस अमृत जैन हे एक निर्भीड आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहे. त्यांनी एकदा दोनदा नव्हे तर चार वेळा यूपीएससी परीक्षा दिली.

Siddhi Hande

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असतं. आपण कितीही मोठे झालो तरीही स्वप्न पूर्ण करायची इच्छा प्रत्येकाची असते. यासाठी अनेकजण लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीदेखील सोडतात आणि स्वप्नांचा पाठलाग करतात. असंच काहीसं अमृत जैन यांनी केलं.

अमृत जैन यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. ते आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आयपीएस अमृत जैन हे मूळचे राजस्थानमधील भीलवाडा येथील रहिवासी. त्यांनी एनआयटी वारंगलमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बीटेक आणि चेक टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हैदराबादमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी सुरु केली. सर्वकाही सुरळीत सुरु होते. परंतु त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली.

अमृत जैन यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात जाले. त्यांनी २०१६ मध्ये कोणत्याही तयारीशिवाय यूपीएससी परीक्षा दिली.त्यांना अतिआत्मविश्वास होता. परंतु ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये खूप अभ्यास करुन यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी फक्त १ गुणांमुळे ते प्रिलियम्स क्लिअर करु शकले नाहीत.

यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्यांनी सांगितले की, कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी खूप मेहनतीने अभ्यास केला. दिवसरात्र एक करुन मेहनत घेतली.त्यांनी मॉक टेस्टदेखील दिल्या. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.

अमित जैन यांनी २०१८,२०१९,२०२० आणि २०२१ मध्ये यूपीएससी (UPSC)परीक्षा दिली. त्यांचे २०१८ मध्ये इंडियन डिफेंस अकाउंट्स सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झाले. त्यानंतर २०१९ मध्ये ३२१ रँक प्राप्त केली. यानंतर २०२० मध्ये ९६ आणि २०२१ मध्ये १७९ रँक प्राप्त केली. त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. परंतु एकदाही त्यांना चांगली रँक मिळाली. त्यामुळे त्यांचे हे स्वप्न अर्धवट राहिले. ते सध्या आयपीएस पदावर कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT