Success Story
Success StorySaam Tv

Success Story: मूर्ती लहान पण किर्ती महान! उंची फक्त ३.५ फूट, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; कोण आहेत IAS आरती डोगरा?

Success Story of IAS Arti Dogra: आयएएस आरती डोगरा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांची उंची फक्त ३.५ फूट आहे परंतु त्यांचे कर्तुत्व खूप महान आहे.
Published on
Summary

IAS आरती डोगरा यांचा प्रवास

उंची फक्त ३.५ फूट पण रचला इतिहास

आईवडिलांच्या मदतीने पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त मेहनत करावी लागते. कोणताही शॉर्टकट हा तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जात नाही. त्यामुळे नेहमी मेहनत करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. असंच काहीसं आयएएस आरती डोगरा यांनी केलं. त्यांनी कोणत्याही इतर गोष्टींकडे लक्ष दिले नाही. त्यांनी फक्त आपले लक्ष्य साध्य करण्यावर फोकस केला. यामुळे त्यांना यश मिळालं. आरती डोगरा यांची उंची फक्त ३.५ फूट आहे. परंतु तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि मेहनत घेतली. त्याचेच फळ त्यांना मिळाले आणि त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

Success Story
Success Story: बी.टेकनंतर बँकेत नोकरी, पुन्हा UPSC ची तयारी; IPS शांभवी मिश्रा यांचा प्रवास

आरती डोगरा यांनी २००६ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे अनेकांना यूपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली आहे.

कोण आहेत IAS आरती डोगरा? (Who is IAS Arti Dogra)

आरती डोगरा या मूळच्या उत्तराखंडच्या देहारादूनच्या रहिवासी आहेत. त्या इतर मुलांपेक्षा वेगळ्या होत्या. त्यांची उंची फक्त ३.५ फूट होती. त्या सर्वात लहान मुलांपेकी एक होत्या. अनेकजण त्यांच्यावर हसायचे. परंतु तरीही त्यांना फार काही फरक पडला नाही. त्यांनी आपल्या मेहनतीने या सर्वांना उत्तर दिले आहे.

आईवडिलांच्या मदतीने रचला इतिहास (IAS Arti Dogra Inspirational Story)

आरती यांचे वडील कर्नल राजेंद्र डोगरा आहेत. तर आई कुमकुम डोगरा या शाळेत मुख्याध्यापिका आहे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कधीच एकटे पडून दिले नाही. त्यांनी नेहमी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.याच सपोर्टमुळे त्यांनी यश मिळवले.

Success Story
Success Story: त्सुनामित घर गेलं, शेतकऱ्याच्या लेकींनी जिद्दीने क्रॅक केली UPSC; एक IAS तर दुसरी IPS अधिकारी

आरती यांचे शालेय शिक्षण देहारादून येथून झाले. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स डिग्री प्राप्त केली. त्यांना प्रशासकीय सेवेत रुजू होऊन देशसेवा करायची होती. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांच्या मेहनतीचे यश त्यांना मिळाले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आणि यश मिळवले.

Success Story
Success Story: बी.टेकनंतर बँकेत नोकरी, पुन्हा UPSC ची तयारी; IPS शांभवी मिश्रा यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com