Subhadra Yojana Saam Tv
बिझनेस

Subhadra Yojana: या राज्यातील महिलांना सरकार देते १०,००० रुपये; सुभद्रा योजना नक्की आहे तरी काय?

Subhadra Yojana For Womens: देशातील विविध राज्यांनी महिलांसाठी खास योजना राबवल्या आहेत. ओडिशा सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १०००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आहेत. देशातील विविध राज्यांमध्येही योजना राबवण्यात आल्या आहेत.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवण्यात आल्या आहेत. महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १०००० रुपये मिळतात.

ओडिशा सरकारने महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर वर्षाला १० हजार रुपये दिले जाणार आहेत. (Subhadra Yojana)

या महिलांना मिळणार १० हजार रुपये (Subhadra Yojana Eligibility)

ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेअंतर्गत अशा महिलांना लाभ मिळणार आहे ज्या राज्याच्या मूळ रहिवासी आहेत. २१ ते ६० वयोगटातील महिला सुभद्रा योजनेसाठी ात्र असणार आहेत. तसेच ज्या महिलांच्या नावावर राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम किंवा राज्य सुरक्षा खाद्य अधिनियमअंतर्गत जारी करण्यात आलेल्या रेशन कार्डमध्ये असेल. अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत १० हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा? (Subhadra Yojana Application Process)

सुभद्रा योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://subhadra.odisha.gov.in/ या साइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील अर्ज करु शकतात. स्थानिक संस्था कार्यालय, अंगनवाडीत जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT