Stock Market Latest News Saam TV
बिझनेस

Stock Market : पडझडीनंतर शेअर बाजाराची मुंसडी, सेन्सेक्स-निफ्टीने घेतली मोठी उसळी, १० शेअर्स तुफान तेजीत

Share Market Update : भारतीय शेअर बाजाराने जोरदार मुंसडी मारली आहे. सेन्सेक्स-निफ्टीने घेतली मोठी उसळी घेतली आहे. आज १० शेअर्स तुफान तेजीत आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : शेअर बाजाराने पडझडीनंतर जोरदार मुसंडी मारली आहे. शेअर बाजारात मंगळवारी सेन्सेक्सने ९४४ अंकांनी उसळी घेत ७९,६९३.६४ वर व्यवहार सुरु झाला आहे. निफ्टीने २७८ अंकानी उसळी घेत २४,३३४.१० वर व्यवहार सुरु झाला आहे. तर बँक निफ्टी ६०० अंकांनी उसळी घेत ५०,६६० पातळीवर व्यवहार करत आहे.

अमेरिकेचा शेअर बाजार रात्री ३ टक्क्यांनी घसरून बंद झाला होता. भारतात सोमवारी शेअर बाजारात सेन्सेक्स २,२२२.५५ अंकानी म्हणजे २.७४ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे सोमवारी सेन्सेक्स ७८.७५९.४० अंकावर बंद झाला. तर निफ्टी ६६२.१० अंकांनी म्हणजे २.६८ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे निफ्टी २४.०५५.६० अंकावर बंद झाला.

बीएसईच्या टॉप ३० शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्समध्ये सर्वाधिक ४ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली आहे. त्यानंतर एल अँड टी, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर इन्फोसिस आणि महिंद्रा अँड महिंद्रा शेअर्समध्येही उसळी पाहायला मिळाली.

GE Shipping च्या शेअर्समध्ये ५.३७ टक्क्यांनी उसळी दिसून आली. पतंजली फूडच्या शेअरमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये ४.६८ टक्क्यांनी उसळी दिसली. zomoato च्या शेअरमध्ये ४.६१ टक्क्यांनी उसळी घेत २६८ रुपयांवर व्यवहार होत आहे. तर डीएलएफच्या शेअर्सने ४ टक्क्यांनी उसळी घेत ८४१ रुपयांवर व्यवहार करत आहे.

५० शेअर अपर सर्किट

NSEच्या २,१६० शेअर्सपैकी १९२१ स्टॉक उसळी घेत व्यवहार करत आहे. तर १९४ शेअर घसरण पाहायला मिळाली. ३४ शेअर्समध्ये ५२ आठवड्यांची तेजी दिसत आहे. तर ७ शेअर ५२ आठवड्यांच्या निचांकी स्तरावर व्यवहार करत आहे. या व्यतिरिक्त ५० अपर सर्किट आणि २१ लोअर सर्किटवर व्यवहार करत आहे.

आयटी क्षेत्रात तेजी

शेअर बाजारात आज आयटी सेक्टरमध्ये तेजी दिसत आहे. आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये २ टक्क्यांनी उसळी दिसत आहे. रियल्टी क्षेत्रात ३ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त एफएमसीजी, मीडिया, मेटल आणि पीएसयू बँकच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांनी उसळी दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT