Explainer : भारतीय शेअर बाजारात हाहा:कार; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात, मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? समजून घ्या ५ मुद्द्यातून

अमेरिकेनंतर भारतीय शेअर बाजारात हाहा:कार झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे १८ लाख कोटी पाण्यात गेले आहेत. मार्केटमध्ये नेमकं काय घडलं, याविषयी ५ मुद्द्यातून समजून घ्या.
भारतीय शेअर बाजारात हाहा:कार; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात, मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? समजून घ्या ५ मुद्द्यातून
Share market Saam tv
Published On

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शेअर बाजारातील घसरणीनंतर गुंतवणूकदारांचे १८ लाख कोटी बुडाले. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे ३० शेअरवाला सेन्सेक्स २६०० अंकांनी घसरला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही ७०० अंकांनी घसरला आहे. अमेरिकेतील शेअर बाजारात पडझड झाल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसत आहे. अमेरिकेत नेमकं काय झालं, ५ मुद्द्यातून समजून घ्या.

आज बीएसई सेन्सेक्सची सुरुवात १३०० अंकांच्या घसरणीने झाली. त्यानंतर सेन्सेक्स बघता बघता २६०० अंकांनी घसरून ७८,२९५.८६ अंकापर्यंत घसरला. दुसरीकडे निफ्टीही ७२० अंकांनी घसरून २४००० अंकांपर्यंत खाली आला. त्यामुळे निफ्टी २३,८९३.७९ अंकापर्यंत खाली कोसळला. शेअर बाजारात मोठी पडझडमध्ये झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे जवळपास १८ लाख कोटींचं नुकसान झालं.

भारतीय शेअर बाजारात हाहा:कार; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात, मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? समजून घ्या ५ मुद्द्यातून
Share Market Crash : शेअर बाजारात उलथापालथ; अमेरिकेतील मंदीच्या धसक्याने सेन्सेक्ससह निफ्टीची घसरगुंडी, कोणते शेअर्स घसरले?

अमेरिकेत नेमकं काय झालं?

अमेरिकेतील मंदीच्या धसक्याने शुक्रवारी शेअर बाजारात मोठं नुकसान झालं. अमेरिकेत पॉलिसी रेटमध्ये कपात करण्यास उशीर होऊ लागल्याने एसआय आणि चिप वाल्या शेअरमध्ये घसरण सुरु झाली आहे. याचा परिणाम भारतासहित जगभरातील शेअर बाजारावर दिसून येत आहे.

भारतीय शेअर बाजारातील पडझडीचे ५ प्रमुख कारणे

१. अमेरिकेत बेरोजगारी दर मागील ३ वर्षांतील उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. अमेरिकेत बेरोजगारी दर ४.३ टक्के इतका झाला आहे. ऑक्टोबर २०२१ नंतर अमेरिकेतील सर्वात मोठा बेरोजगारीचा आकडा आहे.

२. अमेरिकेत मॅन्यूफॅक्चरिंग पीएमआय डेटामध्ये घसरण दिसली. नव्या ऑर्डरमधील कमतरतेमुळे जुलै महिन्यात मागील आठ महिन्यांपासून मॅन्यूफॅक्चरिंग पीएमआय डेटा निचांकी स्तरावर आहे. इन्स्टिट्यूट फॉर सप्लाय मॅनेजमेंटमुसार, जुलै महन्यात ४६.८ पर्यंत आला होता.

३. अमेरिकी आयटी कंपन्यांमध्ये नोकर कपात होणार असल्याचं बोललं जात आहे. अनेक बड्या कंपन्यांनी नोकर कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ग्लोबल आयटी क्षेत्रात दबाव निर्माण झाला आहे.

भारतीय शेअर बाजारात हाहा:कार; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात, मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? समजून घ्या ५ मुद्द्यातून
Share Market : केंद्रात राजकीय स्थैर्य; सेन्सेक्सचा सर्वकालिक उच्चांक

४. जपानी चलन येन अमेरिकी डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला आहे. त्यामुळे जपानमध्ये येन Carry trade संपुष्टात येण्याचा धोका वाढला आहे. यामुळे विक्री वाढण्याची भीती बळावली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे.

५. ग्लोबल टेन्शनमुळेही जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. यामध्ये इस्रायल, हमास आणि इराणमधील वाढत्या संघर्षाचाही समावेश आहे.

नोट - शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com