Stock Market Validity Saam tv
बिझनेस

Stock Market Validity : शेअर बाजारात हाहाकार; स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समधून पैसे काढावेत का?

Stock Market Validity update : शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. यामुळे स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सच्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

Vishal Gangurde

शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात इंडेक्स रेड झोनमध्येच दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. स्मॉल आणि मिडकॅपच्या स्टॉकमध्ये विक्री वाढल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. शेअर बाजाराच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना काय निर्णय घ्यावा, हा प्रश्न पडला आहे. यादरम्यान, आयसीआयसीआयचे प्रूडेंशियल म्युच्युअल फंडचे प्रमुख शंकर नरेन यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.

नरेन म्हणाले की, शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. इंडियन एक्स्प्रेसनुसार, शंकरन नरेन यांचं म्हणणं आहे की, 'स्मॉल आणि मिडकॅपच्या स्टॉकमधून पैसे काढण्याची वेळ आली आहे'. नरेन मार्केट लीडर आहेत. म्युच्युअल फंडची जाण आहे.

शंकर नरेन म्हणाले, 'ज्या गुंतवणूकदारांनी २०२३ साली स्मॉल आणि मिडकॅपच्या शेअर्समध्ये SIP सुरु केली. त्यांचा अनुभव वाईट राहिला आहे. या दोन्ही स्टॉकमधून पैसे काढण्याची वेळ आली आहे. नरेन पुढे म्हणाले, 'आताचं वर्ष हे २००८-१० च्या वर्षापेक्षा वाईट ठरू शकतं. त्यावेळी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे गमावले होते. बँकिंग क्षेत्राचं मोठं नुकसान झालं होतं.

नरेन यांच्या म्हणण्यानुसार, स्मॉल आणि मिड कॅपमधील अस्थिरता कमी होत आहे. परंतु या शेअरमधील तेजी देखील कमी होत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना हायब्रिड स्कीम किंवा मल्टीअसेट फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील दोन महिन्यात स्मॉल कॅप शेअरमध्ये १८ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली होती. मागील आठ आठवड्यात मिडकॅप इंडेक्समध्ये १७.६१ टक्क्यांनी घसरला होता.

स्मॉल कॅप फंडच्या नेट असेट अंडर मॅनेजमेंट डिसेंबरमध्ये ३.२९ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत जानेवारीत ७.१९ टक्यांनी घसरून रक्कम ३.०५ लाख कोटी झाली. असोशिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया आकड्यानुसार, मिडकॅप फंड असेट जानेवारीत २६६०० कोटी रुपये झाला आहे. याआधी डिंसेबरमध्ये ३.९९ लाख कोटी रुपये होती. तर इक्विटी म्युच्युअल फंड नेट दर महिन्याला ३. ३६ टक्क्यांनी घट होऊन जानेवारी २०२५ मध्ये २९.४६ लाख कोटी रुपये झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women's WC: भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पाऊस आला तर...! कोणत्या टीमला मिळणार सेमीफायनलचं तिकीट? पाहा समीकरण

HSRP Number Plate: अजूनही वेळ गेलेली नाही, एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; अन्यथा ₹१०००० दंड भरावाच लागणार, वाचा

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले ब्रिजजवळ दोन कार आणि ट्रकचा भीषण अपघात

Rice Papad Recipe: जेवणासोबत काहीतरी चटपटीत खायचय? घरीच बनवा कुरकुरीत तांदळाचे पापड

Crime : नागपूर हादरले! २३ वर्षीय 'रील स्टार' रिंकीची हत्या, मेकॅनिक नवऱ्याने डोकं फोडलं

SCROLL FOR NEXT