
भारतीय रिझर्व्ह बँकने रेपो रेट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पाँइंट्सने कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेपटमध्ये कपात केल्यानंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे.
आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी निफ्टीमध्ये घसरून होऊन २३,५०० वर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये घसरण होऊन ७७,७३०.३७ वर पोहोचला. आज बँकिग स्टॉक्सचा प्रभाव पाहायला मिळाला.
आज शेअर बाजारात सकाळी सव्वा अकरा वाजता सेन्सेक्स ५० अंकांनी उसळी घेऊन ७८१०० पोहोचला. तर निफ्टीने २५ अंकांनी उसळी घेतली होती. बीएसईच्या ओपनिंगमध्ये टॉप ३० शेअरपैकी १८ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर १२ शेअरमध्ये काही प्रमाणात उसळी पाहायला मिळाली.
पॉवरग्रिड, एसबीआय, आयटीसी आणि टीसीएस सारख्या शेअरमध्ये काही प्रमाणात उसळी पाहायला मिळाली. या व्यतिरिक्त निफ्टीच्या टॉप ५० पैकी २३ शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली. त्यापैकी २७ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. सर्वाधिक घसरण ही पॉवरग्रिडमध्ये पाहायला मिळाली. पॉवरग्रिडमध्ये २ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटच्या दरात कपात केल्यानंतर बँक निफ्टीवरही परिणाम पाहायला मिळाला. निफ्टी बँक १७१ अंकांनी घसरून ५०२०० व्यवहार करत आहे. या व्यतिरिक्त SBI, HDFC बँक, ICICI बँक, अॅक्सिक्स बँक आणि कोटक महिंद्रा बँक सारख्या शेअरमध्ये १.५० टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टी आणि इतर इंडेक्सवरही परिणाम पाहायला मिळाला.
सोनाटा सॉफ्टवेअरच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. एनसीसी शेअरमध्ये १२ टक्के, पीव्हीआरचे शेअर ३ टक्के, कमिंश इंडियाचे ४ टक्के, कोचीन शिपयार्ड ४ टक्के, पीआय इंड्रस्ट्रीज ३ टक्के, वरुण बेवरेज ३ टक्के, आयटीसी २ टक्के, सीमन्सचे शेअर २.२३ टक्क्यांनी घसरले.
निफ्टीच्या २,५७२ शेअरपैकी ८३५ शेअरमध्ये उसळी पाहायला मिळत आहे. तर १६५२ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. ८५ शेअर हे स्थिर होते. या व्यतिरिक्त २४ शेअरने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर गाठला. तर ४६ शेअर ५२ आठवड्यांचा निच्चांकी स्तर गाठला. ५७ शेअरने अपर सर्किट आणि ३५ शेअर निच्चांकी सर्किटवर पोहोचला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.