Share Market Crash Saam Tv
बिझनेस

Share Market Crash: शेअर बाजार धडामधूम, सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी कोसळला; हे टॉप ५ शेअर्स

Siddhi Hande

आज भारतीय शेअर्स मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. इराण आणि इस्त्रायलच्या युद्धाचा परिणाम देशातील शेअर मार्केटवर पाहायला मिळाला. मागील ५ दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये घसरण होत होती. मात्र आज ७ ऑक्टोबर २०२४ रोजी ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ४०० पेक्षा जास्त अंकावर व्यव्हार करत होता. मात्र, काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार आपटला आहे. सेनसेक्स जवळपास ७९० अंकानी घसरला आहे.तर निफ्टी २७९.१५ अंकानी घसरला आहे.

शेअर मार्केटमध्ये आज सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे सरकारी कंपन्याना फटका बसला आहे. आज निफ्टी CPSE निर्देशांक ३.११ टक्क्यांच्या घसरणीसह व्यव्हार करत आहे. तर निफ्टीचा PSE निर्देशांक २.८२ टक्क्यांच्या घसरणीसह व्यव्हार करत आहे. (Share Market Crash Today)

गेल्या काही महिन्यात गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देणाऱ्या रेल्वे आणि संरक्षण कंपन्यांना मोठा फटका बसला होता. पीएम मोदींनी सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

कोणते शेअर्स कोसळले (Share)

आज रेल्वे-संरक्षण क्षेत्रातील शेअर्स कोसळले आहेत. रेल विकास निगम लिमिटेडचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले आहे.Railtel Corporation Of India, RITES, Ircon Internation ,IRFC च्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. त्याचसोबत गार्ड रिच शिपबिल्डिंग, माझगाव डॉक शिपबिल्डिंग, कोचीन शिपयार्ड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत डायनॅमिक्सच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

आजचे टॉप ५ गेनर (TOP Gainers)

आज शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळत असताना काही शेअर्समध्ये वाढ झाली आहे. AU Small Finanace Bank, LTI Mindtress,Presidents Systems, Coforge, Mphasis, Bharati Airtel या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'देवा भाऊ जो बोलता है वो करता है..'; फडणवीसांची रावडी डायलॉगबाजी

Marathi News Live Updates : नगरमध्ये भाजपला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता

Dipa Karmakar Retirement: दीपा कर्माकरचा जिम्नॅस्टीक्स रामराम! अवघ्या ०.१५ गुणांनी हुकलं होतं ऑलिम्पिक मेडल

Nagpur Picnic Spot : नागपूरच्या 'या' तलावात घेता येणार म्युझिकल फाऊंटेनचा आनंद

VIDEO : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शिरसाट यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT