केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना या महिलांसाठी तर काही तरुण पिढीसाठी आहेत. केंद्र सरकारने तरुणांसाठी अशीच एक योजना राबवली होती. ज्यात तरुणांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तरुणांना नोकरी मिळण्यासाठी मदत होणार आहे. याबाबत सरकारने अंतरिम बजेटमध्ये घोषणा केली होती.
देशभरातली तरुणांना नोकरीची संधी मिळावी, त्यांना चांगल्या कंपनीत काम करता यावे, या उद्देशातून ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत तुम्हीला ट्रेनिंग दिले जाईल. त्याचसोबत स्टायपेंडदेखील दिले जाईल. (New Internship Scheme)
बजेट २०२४ मध्ये इंटर्नशिप स्कीमची घोषणा करण्यात आली होती. मिडिया रिपोर्टनुसार, सरकार लवकरच या योजनेबाबत गाइडलाइन्स जारी करणाप आहे. पुढच्या आठवड्यात याबाबत घोषणा होऊ शकते. त्यासोबत या योजनेसाठी एक पोर्टलदेखील सुरु करता येईल.
या योजनेचे नियम आणि अटी?
या योजनेअंतर्गत तरुणांना लाभ घेण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल. या योजनेत २१ ते २४ वयोगटातील तरुण इंटर्न म्हणून काम करु शकणार आहेत. या तरुणांच्या कुटुंबाचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच कोणत्याही पदवीचे शिक्षण घेत असलेले किंवा नोकरी करत असलेले तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. ऑनलाइन कोर्स किंवा वोकेशनल ट्रेनिंगमध्ये सहभागी होऊ शकतात.
योजनेचा लाभ
इंटर्नशिप प्रोग्राम हा स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी राबवण्यात येणार आहे. या योजनेत अनेक तरुणांना कंपनीमध्ये ट्रेनिंग देऊन नोकरीसाठी तयार केले जाईल. या योजनेत तरुणांना नोकरी मिळण्यासाठी मदत होईल.
या योजनेत इंटर्न असलेल्या तरुणांना स्टायपेंड दिली जाणार आहे. योजनेत तरुणांना ५,००० रुपये दिले जाणार आहे. तसेच CSR फंडसाठी कंपन्याना ५०० रुपये दिले जाईल.तसेच ४,५०० रुपये सरकारकडून दिले जाईल.
याचसोबत सरकार प्रत्येक इंटर्नला ६,००० रुपयांचे वन टाइम पेमेंट देईल.
या इंटर्नशिप प्रोग्रामअंतर्गत ट्रेनिंगच्या कालावधीत लागणार खर्च कंपनी उचलणार आहे. तसेच तरुणांच्या राहण्याचा, खाण्यापिण्याची सोय या सर्व गोष्टींचा खर्च सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून होणार आहे.कंपनी आणि तरुणांच्या मध्ये एक दुवा म्हणून काम करणे. जेणेकरुन त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळेल, यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.