Stock Market Crash  Saam Tv
बिझनेस

Share Market Crash : शेअर बाजारात उलथापालथ; अमेरिकेतील मंदीच्या धसक्याने सेन्सेक्ससह निफ्टीची घसरगुंडी, कोणते शेअर्स घसरले?

Share Market update : शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. अमेरिकेतील मंदीच्या धसक्याने सेन्सेक्स-निफ्टी गडगडला आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना फटका दिसत आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : शेअर बाजारात मागील आठवड्यातील शुक्रवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स पत्त्यासारखे कोसळले. अमेरिकेतील मंदीच्या धसक्याने तेथील शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. भारतीय शेअर बाजारातही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात आठवड्याचा आजचा पहिला दिवस 'ब्लॅक मंडे' ठरताना दिसत आहे. शेअर बाजार सुरुच होताच सेन्सेक्स आणि निफ्टी गडगडला. बीएसई सेन्सेक्स ८० हजारांच्या खाली सुरु झाला आहे.

सेन्सेक्ससह निफ्टी जोरदार आपटला

शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअरवाला सेन्सेक्स इंडेक्स हा १२०० अंकांनी घसरून ७९,७००.७७ वर सुरु झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी-५० देखील ४२४ अंकांनी घसरला.

मागील आठवड्यातील शुक्रवारच्या दिवशीच शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली होती. बीएसई सेन्सेक्स ८८५.६० अंकांनी म्हणजे १.०८ टक्क्यांनी घसरून ८०,९८१.९५ अंकांवर बंद झाला होता. निफ्टी५० देखील २९३.२० अंकांनी घसरून २४,७१७.७० वर बंद झाला होता.

शेअर बाजारात मागील आठवड्यात गुंतवणूकदारांचे ४.५६ लाख कोटींचं नुकसान झालं. बीएसई मार्केट कॅप शुक्रवारी ४.५६ लाख कोटींनी घसरून ४५७.०६ लाख कोटी रुपये इतका झाला.

मॅन्यूफॅक्चरिंग पीएमआई टाडामध्ये मोठी घसरण दिसून आल्याने अमेरिकेमध्ये मंदीची शक्यता निर्माण झाली आहे. बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम अमेरिकेच्या बाजारावर होत आहे. यामुळे ग्लोबल आयटी क्षेत्रही दबावात आहे.

शेअर बाजारातील भूकंपानंतर बीएसई ३० शेअरवालामधून २८ स्टॉक रेड झोनमध्ये सुरु झाले. आज सोमवारी टाटा ग्रुपच्या ऑटोमोबाईल कंपनीचा टाटा मोटर्स शेअर ४.२८ टक्के, टाटा स्टील शेअर ३.८९ टक्के, मारुती शेअर ३.१९ टक्के, अदानी पोर्ट शेअर्स ३.२६ टक्के , जेएडब्लू स्टील शेअर ३.२१ टक्के, एसबीआय शेअर ३.१९ टक्के, एम अँड एम शेअर ३.१५ टक्के, एल अँड टी ३ टक्के आणि रिलायन्स शेअर २.२७ टक्क्यांनी घसरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT