नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी प्री-ओपन मार्केट ट्रेडमध्येच तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअरवाला सेन्सेक्सने इतिहास रचला आहे. ३० शेअरवाला सेन्सेक्सने ८०००० आकडा पार केला आहे. प्री-ओपन ट्रेडमध्ये सेन्सेक्सने ३०० अंकानी उसळी घेतली. त्यानंतर दिवसभराचा व्यवहार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळाले.
शेअर बाजारात मंगळवारी व्यवहार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स ०.२७ टक्क्यांनी उसळी घेत ७९,६८७.४९ अकांवर पोहोचला. त्यानंतर काही मिनिटात सेन्सेक्सने हा ७९,८५५.८७ नवा उच्चांक गाठला. तर निफ्टी ०.२५ टक्क्यांनी वाढून २४,२०२.२० हा ऐतिहासिक उच्चांक गाठला. प्री-ओपन मार्केट ट्रेडमध्ये सकाळी ९.०२ वाजता सेन्सेक्स ८०,१२८ अंकावर पोहोचला होता.
सोमवारी बीएसईचा सेन्सेक्स ७०,४७६.१९ अंकाच्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी-५० हा २४,१४१.९५ अंकावर बंद झाला. तर आज एनएसई इंडेक्सने पहिल्यांदा आकडा २४,२०० पार गेला.
प्री-ओपन मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर तासाभरात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. त्याचा परिमाणही शेअर बाजारावर झाला. मंगळवारी सकाळी १०.१५ वाजता निफ्टी १४ अंकानी घसरून २४,१२७ वर पोहचला होता. तर सेन्सेक्स ३६ अंकानी घसरून ७९,४४० वर गेला.
शेअर बाजार सुरु झाल्यावर १९३५ शेअरमध्ये तेजी दिसली. तर ५३६ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर ९७ शेअर स्थिर होते. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर आयशर मोटर्स, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नोलॉजीज, हिरो मोटोकॉर्प निफ्टीचा मोठ्या प्रमाणात व्यवहार झाला. तर बजाज ऑटो, सन फार्मा, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, अदानी एंटरप्राइजेजमध्ये घसरण पाहायला मिळाली.
लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्फी, पॉवरग्रिड,टेक महिंद्रा, टीसीएस आणि एचसीएल टेकमध्ये तेजी पाहायला मिळाली. मीड कॅप कंपन्यामध्ये SolarInds, गोदरेज इंडिया, गोदरेज प्रॉपर्टी, Motherson या शेअरमध्ये तेजी दिसली. तर स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये Refex, ITDC, Godrej Agro, DCXIndia या शेअरमध्ये तेजी दिसली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.