CM Vyoshree Yojana yandex
बिझनेस

CM Vyoshree Yojana: मुख्यमंत्री वयोश्री योजना; जेष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रूपये, जाणून घ्या पात्रतेचे निकष

CM Vyoshree Yojana Benefits: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेस मान्यता मिळाली आहे. या योजनेतून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये देण्यात येणार आहे.

Rohini Gudaghe

Senior Citizens Scheme

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेस फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेतून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये देण्यात येणार आहे. या योजनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री वायोश्री योजना' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असणाऱ्या 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 65 वर्षांवरील या नागरिकांची तपासणी केली (Senior Citizens Scheme) जाईल. त्यानंतर पात्र आढळलेल्यांना तीन हजार रुपये दिले जातील. अंदाजे 480 कोटी रुपये खर्चून ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे योजना

दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत असणाऱ्या 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे. मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनोसपचार केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार (CM Vyoshree Yojana Benefits) आहे.

या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल. यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात (Senior Citizens Scheme benefits) येईल. पात्र व्यक्तींना तीन हजार रुपये लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ

या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटींच्या दरम्यान (CM Vyoshree Yojana) आहे. त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पीडित सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल.

केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते. मात्र, मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT