Income Tax Saving Scheme: राजीव गांधी इक्विटी योजना! गुंतवणुकीवर मिळणार ५० टक्के करसुट

Rajiv Gandhi Equity Scheme: राजीव गांधी इक्विटी बचत योजना आरजीईएसएस म्हणून ओळखली जाते. ही भारताच्या 2012-2013 केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेली कर बचत योजना आहे.
Rajiv Gandhi Equity Scheme
Rajiv Gandhi Equity SchemeSaam Tv
Published On

What Is Rajiv Gandhi Equity Scheme

इनकम टॅक्स रिटर्न भरणं लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर अनेक करदाते अर्ज भरण्यास सुरुवात करतात. जर तुम्हाला तुमचा कर वाचवायचा असेल, तर तुम्हाला राजीव गांधी इक्विटी योजनेबद्दल (Rajiv Gandhi Equity Scheme) माहित असायला हवं. आपण या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या. (latest scheme update)

राजीव गांधी इक्विटी बचत योजना लहान गुंतवणूकदारांना देशांतर्गत भांडवली बाजारात बचत गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. ( 'साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम

राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम (RGESS) ची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2012-13 मध्ये करण्यात आली होती. 2013-14 मध्ये तिचा विस्तार करण्यात आला. ही कर बचत योजना आहे. ही विशेषत: नवीन गुंतवणूकदारांसाठी तयार केलेली योजना आहे. ज्यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये कमी किंवा कोणताही अनुभव नाही. ज्यांचे प्रति वर्ष एकूण उत्पन्न एका विशिष्ट रकमेपेक्षा कमी (What Is Rajiv Gandhi Equity Scheme) आहेत, असे लोकं या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

50 हजार रुपयांची कर सवलत

ही योजना 2012-13 मध्ये सुरू झाली होती. तेव्हा उत्पन्न मर्यादा 10 लाख रुपये ठेवण्यात आली होती. 2013-14 मध्ये उत्पन्न मर्यादा 12 लाख रुपये करण्यात आली. आयकर कायद्याच्या कलम 80CCG अंतर्गत, गुंतवणूकदार वर्षभरात गुंतवलेल्या रकमेच्या 50 टक्के कपातीसाठी अर्ज करू शकतात, ज्यामध्ये त्यांना 50 हजार रुपयांची कर सवलत मिळू शकते.

Rajiv Gandhi Equity Scheme
Central Government Schemes: झोपडपट्ट्या आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्यांना मिळणार स्वतःचं घर, सरकार आणणार योजना; अर्थमंत्र्यांनी केली घोषणा

'या' योजनेचे उद्दिष्ट

भारतातील सिक्युरिटीज मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा पाया विस्तारणे. त्या बदल्यात आर्थिक समावेशन आणि आर्थिक स्थिरता आणणे, हा या योजनेचा उद्देश आहे. हे देशांतर्गत भांडवली बाजारातील सुधारणांना प्रोत्साहन देते. देशात समभाग गुंतवणुक वाढवून बचतीच्या प्रवाहाला प्रोत्साहन देते. (Income Tax Saving Scheme)

योजनेसाठी अटी

किरकोळ गुंतवणूकदार भारताचे रहिवासी असले पाहिजेत. गुंतवणूकदाराचा डेरिव्हेटिव्ह मार्केट आणि इक्विटी मार्केटमध्ये कोणताही व्यवहार नसावा. आर्थिक वर्षासाठी एकूण उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंवा समान असावे. फक्त BSE-100 किंवा CNX-100 किंवा त्यांच्या 'फॉलो-ऑन पब्लिक ऑफर्स' मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक (Income Tax) केली जाऊ शकते. गुंतवणूक फक्त म्युच्युअल फंड किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड योजनांमध्ये केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com