Gold Bond Scheme: स्वस्तात सोने खरेदीचा गोल्डन चान्स; सोमवारपासून तोळ्यावर मिळणार इतकी सूट, अशी संधी पुन्हा नाही

Gold Price Today: भारत सरकारने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना दर्शनी मूल्यावर प्रतितोळा ५०० रुपये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
Gold Bond Scheme 2024
Gold Bond Scheme 2024 Saam TV

Gold Bond Scheme 2024

तुम्ही जर स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महागाईच्या काळात तुम्हाला बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सोमवार, १२ फेब्रुवारीपासून सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) योजनेची चौथी मालिका खुली होणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gold Bond Scheme 2024
Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाचे भाव वधारताच पेट्रोल-डिझलचे नवे दर जारी; महाराष्ट्रात इंधनाचा आजचा भाव काय?

सलग ५ दिवसांसाठी ही सबस्क्रिप्शनसाठी खुली राहणार असून यामध्ये गुंतवणूदारांना १६ फेब्रुवारीपर्यंत गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता येईल. सार्वभौम गोल्ड बाँड योजनेचा परतावा उत्कृष्ट आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक करू इच्छितात.

भारत सरकारने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना दर्शनी मूल्यावर प्रतितोळा ५०० रुपये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, तुम्ही सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये एक ग्रॅम सोने सहा हजार २६३ रुपयांना खरेदी करू शकता.

त्यातच ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना दर्शनी किमतीत प्रति ग्रॅम ५० रुपये सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा प्रकारे, डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी गोल्ड बॉण्ड्सची इश्यू किंमत सहा हजार २१३ रुपये इतकी असेल.

सार्वभौम सुवर्ण रोखे अनुसूचित व्यावसायिक बँका (लहान वित्त बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), सेटलमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), नियुक्त पोस्ट ऑफिसेस, नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे जारी केले जाऊ शकतात.

खरेदी केले गोल्ड बॉण्ड इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड मार्फत विकले जाईल. यामध्ये पैसे गमावण्याचा धोका नाही. यासोबतच सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. सोने खरेदीवरही व्याज दिले जाते. गुंतवणूकदारांनी मुदतपूर्तीपर्यंत बाँड धारण केल्यास, मुदतपूर्तीच्या वेळी मिळणारे उत्पन्न करमुक्त असेल.

Gold Bond Scheme 2024
EPFO Interest Rate: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; आता पीएफच्या पैशांवर मिळणार घसघशीत व्याज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com