Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाचे भाव वधारताच पेट्रोल-डिझलचे नवे दर जारी; महाराष्ट्रात इंधनाचा आजचा भाव काय?

Petrol-Diesel Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारी सकाळी ७ वाजता ब्रेंट क्रूड ऑईलचा दर जवळपास २ डॉलरने वाढला.
Petrol-Diesel Maharashtra Rate Today
Petrol-Diesel Maharashtra Rate Today Saam TV
Published On

Petrol-Diesel Maharashtra Rate Today

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारी सकाळी ७ वाजता ब्रेंट क्रूड ऑईलचा दर जवळपास २ डॉलरने वाढला. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरेल ८२.१९ डॉलर्सवर पोहचले आहेत. दरम्यान, कच्च्या तेलाचे भाव वधारताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Petrol-Diesel Maharashtra Rate Today
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; एअरबॅग उघडून फाटल्या, तिघांचा जागीच मृत्यू

इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलच्या दरात ४४ पैशांनी तर डिझेलच्या दरात ४१ पैशांनी घट झाली आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल २८ पैशांनी स्वस्त झालं आहे. हरियाणा, गुजरात आणि छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.  (Latest Marathi News)

दुसरीकडे हिमाचलमध्ये पेट्रोल २६ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महागले आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपयांवर पोहचला असून डिझेल ९४.२७ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे वाहचालकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२. रुपये आणि डिझेलचा दर ९०.०८ रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

  • कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरवर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०५.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.७१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.१८ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९२.४१ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.६३ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०७.२१ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.५७ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

  • अहमदनगरात पेट्रोलच्या किंमती या १०५.९६ रुपये प्रति लिटर अशा आहेत. डिझेलच्या किंमती ९३.४१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

Petrol-Diesel Maharashtra Rate Today
IMD Rain Alert: मराठवाड्यासह विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा; आज कुठे-कुठे कोसळणार पाऊस? वाचा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com