EPFO Interest Rate: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; आता पीएफच्या पैशांवर मिळणार घसघशीत व्याज

EPFO Latest News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी व्याजदर जाहीर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा व्याजदरात ०.१० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
EPFO Latest News In Marathi
EPFO Latest News In MarathiSAAM TV
Published On

EPFO Interest Rate Latest News

देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी व्याजदर जाहीर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा व्याजदरात ०.१० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या सीबीटीच्या बैठकीत हा निर्णय आला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

EPFO Latest News In Marathi
Gold Silver Rate (10th February 2024): खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याला उतरती कळा, चांदीही गडगडली; जाणून घ्या आजचा भाव

मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. वाढीव व्याजदराला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सूचित केले जाणार आहे. यानंतर, EPFO द्वारे व्याजदराचे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाणार अशी माहिती सीबीटी बैठकीत हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली. (Latest Marathi News)

मात्र, व्याजदरात वाढ केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना पीएफवर तब्बल ८.१५ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. ईपीएफओने गेल्या वर्षी २८ मार्च रोजी २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी ८.१५ टक्के व्याजदर जाहीर केला होता. २०२०-२१ मध्ये हा व्याजदर ८.५% टक्क्यांवर होता.

२० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीत पगारदार वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या १२ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात गुंतवली जाते. त्याचप्रमाणे EPF मध्ये नियोक्त्याकडून समान योगदान दिले जाते.

पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम EPFO अनेक ठिकाणी गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. या व्याजदरात आता वाढ झाल्यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

EPFO Latest News In Marathi
Paytm Payment: पेटीएम पेमेंट्सला मोठा धक्का! EPFO खातेधारकांना कोणतेही व्यवहार करण्यास मनाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com