SBI Recruitment Saam Tv
बिझनेस

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

Government Bank Job: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची तरुण-तरुणींना चांगली संधी आहे. एसबीआय बँकेमध्ये २०७ पदांसाठी भरती निघाली आहे. उमेदवारांनी आताच अर्ज करा.

Priya More
  • एसबीआयमध्ये २०७ स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती

  • एसबीआयमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती

  • लाखो रुपये पगाराची नोकरी मिळवण्याची संधी

  • २५ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे

बँकेमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २०७ पदांसाठी भरती होणार आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी ही भरती होणार असून ही कंत्राटी तत्त्वावर असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एसबीआयच्या sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ सप्टेंबर आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावा.

एसबीआय स्पेशालिस्ट ऑफिसर भरती २०२६ अंतर्गत विविध विशेषज्ञ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा देखील ठरवून देण्यात आली आहे. झोनल हेड (रिटेल) पदासाठी किमान ६० टक्के गुणांसह एमबीए, सीएफपी, सीएफए व्ही-ए यांसारखी संबंधित पात्रता आणि १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी वयोमर्यादा ३५ ते ५० वर्षे आहे. रिजनल हेड पदासाठी ६० टक्के गुणांसह एमबीए आणि बँकिंग, फायनान्स किंवा मार्केटिंगमधील संबंधित प्रमाणपत्रासह उमेदवाराला १२ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठीही वयोमर्यादा ३५ ते ५० वर्षे इतकी आहे.

रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि उमेदवाराला किमान ८ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (एसआय) पदासाठी फायनान्स किंवा इतर शाखांमधील पदव्युत्तर पदवी किंवा सीएफए/सीए यासारखी पात्रता आणि उमेदवाराला ६ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी वयोमर्यादा २८ ते ४२ वर्षे इतकी असावी. इन्व्हेस्टमेंट ऑफिसर पदासाठी देखील ४ वर्षांचा अनुभव असावा आणि वयोमर्यादा २८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावी.

व्हाईस प्रेसिडेंट वेल्थ या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विषयातील पदवी असावी आणि किमान ६ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २६ ते ४२ वर्षे असावी. असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट वेल्थ या पदासाठी उमेदवाराकडे पदवी असावी आणि किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी वयोमर्यादा २३ ते ३५ वर्षे इतकी आहे. पदानुसार उमेदवारांना ३ ते १५ वर्षांचा अनुभव आवश्यक असतो. वयोमर्यादा देखील पदानुसार बदलत आहे. या सर्व पदांसाठी किमान वय २३ वर्षे आणि कमाल वय ५० वर्षे इतके आहे.

महत्वाचे म्हणजे, या सर्व पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीला ५ वर्षांच्या करारावर नियुक्ती केली जाणार आहे. प्रदेशानुसार बँक कालावधी ३ ते ४ वर्षांनी वाढवू शकतो. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लाखो रुपये पगार मिळेल. मुलाखतीदरम्यान उमेदवार आणि बँक यांच्यात पगारावर चर्चा केली जाऊन आणि मगच उमेदवाराचा पगार ठरवला जाईल.

या पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होईल. एक किंवा दोन फेऱ्यात मुलाखत होईल. या मुलाखती टेलिफोन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाईल. मुलाखती ही १०० गुणांची असणार आहे. याच मुलाखतीमध्ये पगार आणि सीटीसीवर चर्चा केली जाईल. या पदांसाठी उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा. त्याचसोबत अर्ज शुल्क देखील भारावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! 'या' ७ चुका टाळा, नाहीतर रोजचा १ कप चहा पिणेही होईल बंद

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

SCROLL FOR NEXT