SBI Clerk Recruitment 2025 google
बिझनेस

SBI Clerk 2025 : SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क पदासाठी मोठी भरती, ६५८९ रिक्त जागा

Bank Jobs : एसबीआय क्लर्क भरती 2025 अंतर्गत ६५८९ पदांसाठी परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे. उमेदवारांसाठी प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार असून परीक्षेचा पॅटर्न जाहीर करण्यात आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

आता नोकरीची चिंता मिटली. बॅंकेत काम करण्याची ईच्छा असणाऱ्यांना आता सुवर्ण संधी मिळाली आहे. SBI बॅंकेने नुकतीच क्लर्क पदासाठी भरती जाहीर केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने यासाठी प्रिलिम्स परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यामध्ये ६५०० हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ६५८९ पदे जाहीर झाली आहेत. यामध्ये ५१८० पदे रेग्युलर क्लर्कसाठी तर १४०९ पदे बॅकलॉग अंतर्गत राखीव ठेवण्यात आली आहेत. अर्ज प्रक्रिया ६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान पार पडली होती.

एसबीआय क्लर्क भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार एसबीआय क्लर्क ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा २०, २१ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल. उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळणार असून हे प्रवेशपत्र लवकरच एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर प्रसिद्ध होणार आहे. परीक्षेला हजेरी लावणाऱ्या उमेदवारांनी आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे. भविष्यातील सोयीसाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राचा प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.

या परीक्षेच्या पॅटर्नबद्दल देखील उमेदवारांना स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. एसबीआय क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. या परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी असेल. इंग्रजी भाषेचे ३० प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे ३५ प्रश्न आणि तर्कशक्ती क्षमतेचे ३५ प्रश्न अशा स्वरूपात प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयासाठी वेगळा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद असून चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.

तसेच प्रिलिम्स परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार मुख्य परीक्षा आणि भाषा चाचणीसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत १९० प्रश्न विचारले जाणार असून अंतिम निवड ही उमेदवारांच्या कामगिरीनुसार केली जाईल. बँकेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT