Sanchar Saathi App Saam Tv
बिझनेस

Sanchar Saathi App: एका दिवसात ६ लाख लोकांनी डाउनलोड केला 'संचार सारथी'; अ‍ॅपची खासियत आहे तरी काय?

Sanchar Saathi App Downloads: प्रत्येक नवीन फोनमध्ये संचार साथी अॅप डाउनलोड करणे गरजेचे केले आहे. यासाठी मोबाईल कंपन्यांना निर्देश दिले आहेत. दरम्यान, मंगळवारी एका दिवसात लाखो लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.

Siddhi Hande

प्रत्येक नवीन फोनमध्ये संचार साथी अ‍ॅप गरजेचे

एका दिवसात लाखो लोकांनी केले अ‍ॅप डाउनलोड

सायबर सिक्युरिटीच्या दृष्टी अ‍ॅप आवश्यक

केंद्र सरकारने सर्व फोनमध्ये संचार साथी अॅप डाउनलोड करायला सांगितले आहे. संचार साथी अॅप हा प्ले स्टोअरवर उपलब्ध झाला आहे. लाखो लोकांनी अवघ्या काही दिवसात हा अॅप डाउनलोड केला आहे. सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने हा अॅप डाउनलोड करणे गरजेचे आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.

दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संचार साथी अॅप मंगळवारी जवळपास लाखो लोकांनी डाउननोड केले आहेत. एका दिवसात अॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या ६० हजारांवरील ६ लाख झाली आहे. त्यामुळे हा संचार साथी अॅप ग्राहकांच्या पसंतीस आल्याचे दिसत आहे.

संचार साथ अॅपवर विरोधकांकडून टीका

विरोधी पक्षनेत्यांनी संचार साथी अॅपवर अनेक आरोप लावले आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांच्या प्रायव्हसीचे उल्लंघन होईल, असा आरोप केला जात होता. मात्र, दूरसंचार विभागाने स्पष्ट केलंय की, दररोज संचार साथी अॅप डाउनलोड करण्याची संख्या १० पट वाढत आहे. एका दिवसात लाखो लोकांनी अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. लोकांचा अॅपवरील विश्वास वाढत आहे.

काय आहे खासियत? (Features)

अधिकृत माहितीनुसार, १.५ कोटी लोकांनी संचार साथी अॅप डाउनलोड केले आहे. या अॅपमुळे मोबाईलमध्ये फसवणूक होत असल्यास अलर्ट मिळणार आहे. या अॅपमुळे फोनमध्ये सायबर सिक्युरीटी असणार आहे. तुमच्या फोनमध्ये जर कोणता फ्रॉड नंबर किंवा मेसेज आला तर त्याचा अलर्ट तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुमच्या फोनचा IMEI नंबर हा दुसऱ्या कोणाला दिला जाणार नाही. अनेकदा एकाच IMEI नंबरचे अनेक फोन असतात. त्यामुळे गुन्हे होतात. मात्र, आता एकाच व्यक्तीकडे एकच नंबर असणार आहे. त्यामुळे जर फ्रॉड झाला तरी गुन्हेगारांना शोधणे खूप सोपे होणार आहे.

मोबाईल कंपन्यांना दिले निर्देश

दूरसंचार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, भारतात उत्पादित आणि आयात केलेल्या सर्व नवीन फोनमध्ये हा अॅप असणे आवश्यक आहे. १२० मोबाईल कंपन्यांना याबाबत आदेश दिले आहे. ९० दिवसांच्या आत हे अॅप फोनमध्ये डाउनलोड करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tatkal Ticket: तत्काळ तिकीटाच्या नियमामध्ये मोठा बदल, रेल्वेचा महत्वाचा निर्णय

डॉलरची नाईन्टी, रुपयाच्या गटांगळ्या; EMI, मुलांचं शिक्षण ते दैनंदिन खर्च; किती भयंकर असेल परिस्थिती, वाचा

पुण्यातील नामांकित शाळेला बॉम्बनं उडवण्याची धमकी|VIDEO

Maharashtra Live News Update: धनगर समाज बांधवाकडून दीपक बोऱ्हाडे यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणी

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

SCROLL FOR NEXT