Sanchar Saathi: ना डिलिट होणार, ना डिसेबल; सरकार तुमच्या फोनमध्ये करणार अ‍ॅप इन्स्टॉल; नेमका प्लान आहे तरी काय?

Sanchar Saathi App: आता प्रत्येक नवीन हँडसेटमध्ये संचार साथी अॅप इन्स्टॉल असणार आहे. कोणत्याही प्रकारचा गुन्हा होऊ नये, यासाठी हे अॅप इन्स्टॉल केले जाणार आहे.
Sanchar Saathi
Sanchar SaathiSaam Tv
Published On
Summary

आता प्रत्येक फोनमध्ये इन्स्टॉल होणार संचार भारती अॅप

संचार भारती अॅपचं काम काय?

सायबर क्राइमपासून वाचण्यासाठी सरकारचे निर्देश

दूरसंचार विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक नवीन मोबाइल फोनमध्ये संचार साथी अॅप प्री इन्स्टॉल असणे अनिवार्य आहे. मोबाईल निर्मात्या कंपन्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. यानुसार तुम्हाला हा अॅप इन्स्टॉल करायचा आहे. सायबर सुरक्षा आणि बनावट किंवा ड्युप्लिकेच IMEI असलेल्या डिव्हाइससेच्या समस्यांचे निकारण करणे हे यामागच उद्दिष्ट आहे.

Sanchar Saathi
EPFO EDLI Scheme: तुमचं PF अकाउंट आहे? तुम्हाला मिळतो ७ लाखांचा मोफत विमा; कसं? वाचा सविस्तर

दूसरंचार विभागाने मोबाईल हँडसेटची वास्तविकता पडताळण्यासाठी संचार साथी अॅप इन्स्टॉल करण्याच्या सूचना जारी केल्या आहे. हे अॅप पहिल्यांचा फोन सेटअप करताना युजर्संना दिसायला हवे. काम करण्यासाठी योग्य आणि सक्षम असायला हवे.

दरम्यान, मोबाईल कंपन्यांना हे आधी बघावे लागेल की, डिव्हाइस सेटअप करताना अॅप आहे की नाही. तसेच हे अॅप डिसअॅबल आणि रिस्ट्रिक्ट केला जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हे अॅप डिलिटदेखील करता येणार नाहीये.

संचार पोर्टल अॅप आहे तरी काय? (What is Sanchar Bharti App)

संचार साथी पोर्टल आणि अॅप नागरिकांना आययएमईआय असणारे नंबर पडताळण्यासाठी सुविधा देतात. यामुळे ड्युप्लिकेट किंवा स्पूफ्ड आयएमईआय वाले मोबाईल फोन सायबर सुरक्षेसाठी हानीकारक आहे.यामुळे नेटवर्कमध्ये स्फूफ्ड किंवा छेडछाड केलेले IMEI निर्माण करतात. यामुळे एकच IMEI दोन वेगवेगळ्या डिव्हाइसवर काम करते. त्यामुळे खऱ्या IMEI ला ओळखणे कठीण होते.यामुळे हे अॅप इन्स्टॉल केले जाणार आहे.

Sanchar Saathi
EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

सरकारचे म्हणणे काय?

देशात सध्या खूप जास्त प्रमाणात सेकंड हँड स्मार्टफोन विकले जात आहेत. यामध्ये चोरीला गेलेल्या अनेक हँडसेटची विक्री झाली आहे. यामुळे कदाचित तुमच्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरस इन्स्टॉल केलेला असू शकतो. यामुळे आर्थिक नुकसान होई शकतात. या संचार भारती अॅपमुळे तुम्हाला ब्लॉक IMEI तपासता येणार आहे. यामुळे तुम्हाला मोबाईल घेण्याआधीच हा स्मार्टफोन योग्य आहे की नाही हे कळणार आहे.

Sanchar Saathi
Corn Appe: संध्याकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा मक्याचे अप्पे; १० मिनिटांत होतील तयार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com