Aadhaar-Mobile Link: आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक? जाणून घ्या एका क्लिकवर

How to Check which Mobile Number Link to Aadhaar: आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला घसबसल्या तुमचा कोणता मोबाईल नंब लिंक आहे हे समजणार आहे.
Aadhaar-Mobile Link
Aadhaar-Mobile LinkSaam Tv
Published On

आधार कार्ड हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक आधार कार्डवर १२ अंकी युनिक नंबर असतो. दरम्यान, अनेक कामांसाठी आधार कार्ड गरजेचे असते. बँक अकाउंट उघडण्यापासून ते पॅन लिंक करण्यासाठी सर्व कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. दरम्यान, आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला हवा.

अनेकदा आपल्याला आधारशी लिंक मोबाईलव ओटीपी येतो. त्यामुळे तुमच्या आधारशी नक्की कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. तुम्ही याबाबत काही क्लिकवर माहिती मिळवू शकतात.

Aadhaar-Mobile Link
EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

आधार कार्डशी कोणता मोबाईल लिंक,अशा पद्धतीने करा चेक (How to Link Aadhaar-Mobile Number)

UIDAI ने आधार लिंक्ड मोबाईल नंबर शोधण्यासाठी सोपी प्रोसेस केली आहे. तुम्ही काही मिनिटातच याबाबत ऑनलाइन माहिती मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला सर्वात आधी UIDAI च्या वेबसाइटवर व्हेरिफिकेशनवर जायचे आहे. यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. याचसोबत तुमचा मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्हाला Proceed to Verify वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचा नंबर लिंक आहे की नाही हे समजणार आहे. याचसोबत जर नंबर लिंक नसेल तर ती प्रक्रियादेखील पुढे होणार आहे.

Aadhaar-Mobile Link
Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

आधार कार्ड- मोबाईल नंबर लिंक करणे का गरजेचे?

तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर अनेकदा ओटीपी येतो. तो वेरिफाय करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही कोणतीही ई केवायसी प्रोसेस करु शकतात. याचसोबत तुम्ही PAN लिंकिंग, DigiLocker आणि सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकतात. बँकिंग आणि सब्सिडीच्या सेवांचाही लाभ घेण्यासाठी मदत होते. याचसोबत तुम्हाला जर आधार अपेडट करायचे असेल तर ऑनलाइन पद्धतीने करु शकतात.

जर तुमचा आधारशी लिंक नंबर बंद झाला असेल तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. यामुळे तुम्हाला नेहमी वेरिफाय करणे गरजेचे आहे.

Aadhaar-Mobile Link
Aadhaar-Pan Link: पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटचे ३० दिवस, वाचा ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com