

आधार कार्डमध्ये आता फोटोशी जोडलेला QR कोड येणार आहे.
ओळख पडताळणी काही सेकंदात होण्यास मदत होईल.
बँकिंग, KYC आणि सरकारी सेवा घेणे अधिक सोपे होणार आहे.
भारतीय नागरिकांची ओळख असलेल्या आधार कार्डमध्ये UIDAI एक मोठा बदल करण्यात येणार आहे. लवकरच आधार कार्डमध्ये फोटोशी QR कोड जोडला जाणार आहे. यामुळे ओळख पडताळणी सोपी, जलद आणि अधिक सुरक्षित होईल. काय बदल होतील, तुम्हाला कोणते फायदे मिळतील ते जाणून घ्या. हा QR कोड स्कॅन केल्यावर, कार्ड खरे आहे की नाही हे लगेच कळणार आहे. म्हणजेच काय तर बनावट कागदपत्रे दाखवून एखाद्याची फसवणूक करणे आता जवळजवळ अशक्य होणार आहे. यामुळे तुमचे आधार कार्ड आणखी विश्वासार्ह होईल.
UIDAI ऑफलाइन पडताळणी सोपे आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. QR कोड हे काम जलद करतात. यासाठी फक्त ते स्कॅन करावे लागते. स्कॅन होताच तुमच्या ओळखी लगेचच पुष्टी होईल. UIDAI आता आधार कार्डमध्ये एक विशेष QR कोड आणणार आहे. हा QR कोड तुमचा फोटो आणि महत्त्वाच्या माहितीशी जोडला जाणार आहे. याचा अर्थ जर कोणी तुमचा आधार स्कॅन केला तर तुमची ओळख लगेच त्यांच्या स्क्रीनवर दिसून येईल. यामुळे कार्डची सत्यता पडताळणे अत्यंत सोपे होईल.
आजही अनेक ठिकाणी आधार कार्डची छायाप्रत पुरेशी आहे. पण कधीकधी लोक फोटो बदलून किंवा त्यात एडिट करून त्यात छेडछाड करतात. क्यूआर कोड स्कॅनमुळे तुमचे खरे नाव आणि मूळ फोटो उघड होईल. त्यामुळे ही समस्या सोडवता येईल. याचा अर्थ कोणीही तुमच्या ओळखीशी छेडछाड करू शकणार नाहीये. तसेच नवीन क्यूआर-कोडमुळे आधार कार्डची ऑफलाइन पडताळणी पूर्वीपेक्षा अधिक सोपी होईल.
आधी कार्यालय, बँक किंवा दुकानात ओळखपत्र दाखवण्यासाठी छायाप्रत आवश्यक होती. पण आता, क्यूआर कोड स्कॅन केल्याने तुमची खरी ओळख लगेच उघड होईल. तुमचा आधार मॅन्युअली पडताळणी करण्याचा त्रास दूर होईल आणि ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप जलद होईल.
जेव्हा तुम्ही बँक खाते उघडायला जाता किंवा नवीन सिम कार्ड खरेदी करायला जाता तेव्हा आधार पडताळणीला बराच वेळ लागतो. पण QR कोडच्या मदतीने ही प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होईल. यामुळे केवळ वेळ वाचणार नाही तर बनावट कागदपत्रांचा गैरवापरही रोखला जाणार आहे. क्यूआर कोडमुळे गैरवापर करणे कोणालाही सहज शक्य होणार नाही.
आधी पेन्शन, गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती किंवा शेतकरी योजना यासारख्या सरकारी योजनांमध्ये ओळख पडताळणी ही एक मोठी समस्या बनत होती. लाभार्थ्यांना अनेकदा कागदपत्रांमधील चुका किंवा त्यांच्या ओळखीतील विसंगतींमुळे त्रास सहन करावा लागतो. नवीन QR-आधार ही समस्या सोडवेल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.