BSNL चा धमाका! अनलिमिटेड कॉलिंग अन् १०० जीबी डेटा; विद्यार्थांसाठी आणला नवा प्लॅन

BSNL Launches Special Plan : बीएसएनएलने २५१ रुपयांचा एक खास विद्यार्थी प्लॅन आणलाय. यात १०० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात.
BSNL Launches Special Plan
BSNL launches a special ₹251 plan offering 100GB data and unlimited calling for students.saam tv
Published On
Summary
  • बीएसएनलने २५१ रुपयांचा विद्यार्थ्यांसाठी खास प्लॅन लॉन्च केलाय.

  • बालदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन प्लॅन लॉन्च करण्यात आलाय.

  • मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेला किफायतशीर रिचार्ज.

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनलने विद्यार्थ्यांसाठी एक खास मोबाईल प्लॅन आणलाय. हा प्लॅन बालदिनाच्या दिवशी लॉन्च करण्यात आला होता. बीएसएनएलचे सीएमडी ए. रॉबर्ट जे. रवी यांच्या मते, कंपनी विद्यार्थी आणि महिलांसाठी विशेष प्लॅन सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा विद्यार्थ्यांसाठी आणलेला विशेष प्लॅन आहे.

हा नवीन प्लॅन मर्यादित कालावधीसाठी ऑफर देण्यात आलीय. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवून प्लॅन तयार करण्यात आलाय. दररोज सुमारे ८.९६ रुपयांच्या म्हणजेच २५१ रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सारख्या सर्व आवश्यक सुविधा मिळणार आहेत.

किंमत: २५१ रुपये

वैधता: १४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध

फायदे

अमर्यादित कॉलिंग

१०० जीबी हाय-स्पीड डेटा

दररोज १०० एसएमएस संदेश

BSNL Launches Special Plan
Navi Mumbai: ख्रिसमसपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा; जाणून घ्या उड्डाणांचे वेळापत्रक अन् संपूर्ण ऑपरेशन

ही ऑफर सर्व बीएसएनएल ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी, ग्राहक जवळच्या बीएसएनएल सीएससी सेंटरला भेट देऊ शकतात, १८००-१८०-१५०३ वर कॉल करू शकतात किंवा bsnl.co.in ला भेट देऊ शकतात. कंपनी देशभरात आपले स्वदेशी ४जी नेटवर्क आणलंय त्यानंतर हा प्लॅन आणलाय, त्यामुळे युजर्सचा मोठा प्रतिसाद मिळेल असं बीएसएनएलचे प्रमुख रवी म्हणालेत.

BSNL Launches Special Plan
Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

भारत हा जगातील पाचवा देश आहे ज्याने स्वतःचे 4G तंत्रज्ञान विकसित केलंय. बीएसएनएल दीर्घकाळापासून त्याच्या विकासकार्यात व्यस्त आहे, अशी माहिती ए. रॉबर्ट जे. रवी यांनी दिलीय. डेटाने समृद्ध असलेल्या या प्लॅनमुळे विद्यार्थ्यांना 'मेक इन इंडिया' ४जी नेटवर्कचा सर्वोत्तम अनुभव मिळेल. १०० जीबी डेटासह, त्यांना पूर्ण २८ दिवसांसाठी नवीन नेटवर्कची गुणवत्ता मिळेल, असेही ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com