Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

Income Tax Refund Update: सर्व प्रलंबित आयकर परतावे पुढील महिन्यापर्यंत जारी केले जाणार आहेत. लहान-मूल्याचे परतावे प्रक्रिया आधीच करण्यात आलेत. तर चुकीचे दावे असलेल्या करदात्यांना दुरुस्त्यांसाठी ईमेल पाठवण्यात आल्याची माहिती सीबीडीटीचे प्रमुख रवी अग्रवाल यांनी दिलीय.
Income Tax Refund  Delay
CBDT announces that all pending income tax refunds will be cleared soon; taxpayers asked to correct errors in claims.saam tv
Published On
Summary
  • करदात्यांना सुधारणा करण्यासाठी सीबीडीटीकडून ईमेल पाठवण्यात आलेत.

  • परताव्याची गती वाढवण्यासाठी विभाग कार्यरत आहे.

  • करदात्यांना ई-मेलमध्ये मागितलेली माहिती वेळेवर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आलाय.

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, सर्व प्रलंबित आयकर परतावे पुढील महिन्यापर्यंत जारी केले जाणार आहेत. याची माहिती सीबीडीटीचे प्रमुख रवी अग्रवाल यांनी दिलीय. लहान आणि कमी मूल्याचे परतावे आधीच जारी करण्यात आलेत. तसेच ज्यांच्या दाव्यामध्ये चुका झाल्यात त्या कर दात्यांना ईमेल पाठवण्यात आलेत.

यात सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जेव्हा उच्च-मूल्याच्या परताव्यासाठी फायली उघडल्या गेल्या, तेव्हा अनेक प्रकरणांमध्ये चुकीचे दावे आढळले होते. यासाठी ज्यांना मेल पाठवलाय त्यांनी त्या सुधारणा कराव्यात असं सीबीडीटीचे प्रमुख रवी अग्रवाल म्हणालेत.

Income Tax Refund  Delay
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; e-KYC साठी मुदतवाढ, शेवटची तारीख काय?

आयकर विभाग प्रत्येक परताव्याचे विश्लेषण करत आहे. ते ग्रीन चॅनेलमध्ये आणले जात असताना ते सोडत आहे. सीबीडीटी प्रमुखांच्या मते, "सर्व परतावे या महिन्यात किंवा पुढील महिन्यात दिले जातील." करदात्यांना ई-मेलमध्ये मागितलेली माहिती वेळेवर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे जेणेकरून परतफेड प्रक्रियेला विलंब होणार नाही.

Income Tax Refund  Delay
Navi Mumbai: ख्रिसमसपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा; जाणून घ्या उड्डाणांचे वेळापत्रक अन् संपूर्ण ऑपरेशन

आयटीआर आणि कर नियम बदलणार

सीबीडीटी प्रमुख रवी अग्रवाल यांनी चीनी आयकर कायदा २०२५ बद्दल देखील चर्चा केली. प्राप्तिकर विभाग जानेवारीपर्यंत सरलीकृत आयकर रिटर्न (ITR) फॉर्म आणि नवीन नियम अधिसूचित करेल. हे नियम प्राप्तिकर कायदा, २०२५ अंतर्गत लागू केले जातील, जो पुढील आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com