

सरकारी मोजणी ही खरी सीमारेषा ठरवण्याची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे.
चुकीच्या जुन्या मोजणी, खुणा नाहीशा होणे, जाणूनबुजून ताबा घेणे अशा अनेक कारणांमुळे वाद होतात.
कायदेशीर तक्रार, नोटीस व न्यायालयीन मार्गानेही जमीन परत मिळवता येते.
जमीन ताबा, सीमारेषा व मोजणीसंदर्भात अनेकदां वाद होत असता बहुतेकवेळा शेतजमिनीच्या बाबत असे वाद होताना आपण पाहिलेत. आपल्या शेतजमिनीचा भाग शेजारच्या हद्दी गेल्याचं लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये वाद होऊ लागतात. कारण कोणताच शेतकरी आपली शेतजमिनीवरील हक्क सोडण्यास तयार नसतो.
आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही जुन्या मोजणीत झालेल्या चुका, पिकांची फेरबदल, सीमारेषेवरील खुणा नाहीसा होणे. जाणूनबुजून जमीन ताब्यात घेण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. तुम्हीही अशाच समस्येला तोंड देत असाल तर जमीन परत मिळवण्याची कशी ही प्रक्रिया जाणून घेऊ.
कोणी शेतजमिनीच्या अशा समस्यांना सामोरे जात असेल तर त्या शेतकऱ्याने सर्वप्रथम स्थानिक तलाठी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करावी. तक्रारीत सर्व सर्वे नंबर, गट नंबर, गटाची सीमा, अंदाजे किती जमीन ताब्यात गेली आहे याचे तपशील नमूद करणे आवश्यक आहे. तक्रार मिळाल्यावर तलाठी प्राथमिक पाहणी करेल तो दोन्ही पक्षांना बोलून त्या समस्येबाबत तोडगा काढेल.
जमिनीचा वाद सोडवण्यासाठी अधिकृत मोजणी हा सर्वात निर्णायक पर्याय आहे. तलाठीच्या पाहणीनंतर दोन्ही बाजूने सहमती मिळाल्यास शेतकर्याने मोजणीसाठी अर्ज मंडळाधिकारी(तहसील कार्यालय) यांच्याकडे करावा. जमाबंदी खात्याच्या नियमांनुसार अधिकृत मोजणी अधिकारी जागेवर येऊन आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने सीमारेषा ठरव देईल. DGPS किंवा ETS ने जमीन मोजणी केली जाईल. या मोजणीचा अहवाल आल्यानंतर कोणाकडे जमीन किती प्रमाणात गेली आहे हे स्पष्ट होईल.
मोजणी अहवालासह तहसीलदार कार्यालयात अधिकृत अर्ज करावा, त्यातून जमीन परत मिळवण्यासाठी आदेश मागू शकतो. तहसीलदार दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मोजणीच्या आधारावर निर्णय देतील. जमीन चुकीने ताब्यात गेली असल्यासचं निष्पण झाल्यास तहसीलदार शेजाऱ्याला जमीन रिकामी करण्याचा आदेश देतील. तहसीलदाराचा आदेश मिळाल्यानंतर आवश्यकता भासल्यास मंडळाधिकारी, तलाठी, पोलीस यांच्यासह प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन शेतकऱ्याला त्याचा मूळ ताबा मिळवून देत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.