
दूरसंचार विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दूरसंचार विभागात चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळणार आहे.
दूरसंचार विभागात टीईएस ग्रुप बीअंतर्गत डिविजनल इंजिनियर (SDE)पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. दूरसंचार विभागातील भरतीसाठी dot.gov.in तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२४ आहे. (Government Job)
दूरसंचार विभागात ४८ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीबाबत सर्वाधिक २२ पदे नवी दिल्ली येथे भरली जाणार आहेत. अहमदाबाद शिलाँगमध्ये ३, मुंबईत ४ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. त्याचसोबत गंगटोक, गुवाहाटी, सिकंदराबाद येथे भरती होणार आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४७६०० ते १५११०० रुपये पगार मिळणार आहे. (Telecommunication Department Bharti)
दूरसंचार विभागात डिविजनल इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. (Telecommunication department recruitment 2024)
सरकारी नोकरी
सध्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती nia.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. ३३ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२५ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.