Ravindra waikar vs amol kirtikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार? वाचा सविस्तर

Ravindra waikar Latest News : शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलीये. वायकर विरुद्ध कीर्तिकर या प्रकरणाचा निकाल कोर्टाने राखून ठेवल्याची माहिती हाती आली आहे.
रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार? वाचा सविस्तर
ravinda waikafrSaam tv
Published On

गिरीश कांबळे, साम टीव्ही

मुंबई : खासदार रवींद्र वायकर यांचं टेन्शन वाढवणारी बातमी हाती आली आहे. रवींद्र वायकर यांच्या खासदारकीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच या निर्णयाकडे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे लक्ष लागलं आहे.

रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार? वाचा सविस्तर
Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, महायुतीचे तिन्ही नेते आज दिल्लीला जाणार

रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला होता. यानंतर अमोल कीर्तिकर यांनी मतमोजीत घोळ असल्याचा आरोप करत रवींद्र वायकर यांना अपात्र करण्यात यावे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली आहे. मात्र, कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांची खासदारकीचं काय होणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार? वाचा सविस्तर
Maharashtra Politics : 15 सेकंदासाठी बांगलादेशाची सीमा खुली करा; नवनीत राणा अशा का म्हणाल्या?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर यांचा विजय संशयास्पद असल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. या निवडणुकीत रवींद्र वायकर यांना ४,५२,६४४ मते मिळाली होती. तर अमोल कीर्तिकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली होती. या निवडणुकीत अमोल कीर्तिकर यांना ४८ मतांनी पराभव झाला होता.

रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार? वाचा सविस्तर
Maharashtra Politics : अनोखा योगायोग! आबांच्या एक्झिटदिवशी रोहित पाटलांची शपथ, पहिलंच भाषण जोरदार गाजलं, वाचा

कीर्तिकरांच्या वकिलांनी काय युक्तीवाद केला?

अमोल कीर्तिकर यांचे वकीलव प्रदीप आणि अमित कारंडे यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, 'मतमोजणीदरम्यान १२० निविदा मतांची मोजणी झाली नाही. माहितीनुसार, त्यावेळी ३३३ पैकी १२० मते मोजण्यात आली नाही. यामुळे फेरमोजणीची विनंती करण्यात आली. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी ही विनंती नाकारली'.

रवींद्र वायकरांचे वकील काय म्हणाले?

वायकर यांचे वकील अनिल साखरे म्हणाले, 'या दाखल झालेल्या याचिकेत कोणत्याही प्रकारचे ठोस मुद्दे नाहीत. त्यामुळे न्यायालयाला अशी याचिका फेटाळण्याचा अधिकारी आहे. कारण याचिकाकर्त्याने सर्व निविदा मते विजयी उमेदवाराला कशा प्रकारे मिळाली आहे, हे दाखवणारे कोणत्याही प्रकारचे पुरावे जोडले नाहीत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com