Ravindra Waikar : अनंत नर यांच्याकडून मतदारसंघात गुंडगिरी; खासदार रवींद्र वायकर यांचा गंभीर आरोप

Jogeshwari News : मातोश्री क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत रवींद्र वायकर यांनी उबाठा उमेदवार अनंत नर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे केली
Jogeshwari Vidhan Sabha
Jogeshwari Vidhan SabhaSaam tv
Published On

संजय गडदे
नवी मुंबई
: जोगेश्वरी पूर्व मतदार संघातील उबाठा गटाचे उमेदवार अनंत (बाळा) नर यांची मतदार संघात गुंडगिरी सुरू असून मंगळवारी रात्री दोनशे कार्यकर्त्यांसह दगडफेक करून दंगल घडवल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनी आज केला. 

मातोश्री क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी उबाठा उमेदवार अनंत नर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे केली. दरम्यान रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार आहेत. याच मतदार संघात मागील काही दिवसांपासून अनंत नर यांची गुंडगिरी सुरू असून मतदारांना धमकावले जात आहे असा आरोप वायकर यांनी केला. तर दंगलग्रस्त जोगेश्वरीचे आम्ही सोन बनवलं असे खासदार वायकर म्हणाले. आमच्या प्रचाराबाबत त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी कायद्याने पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला तक्रार करावी असे खासदार वायकर यांनी सांगितले. 

Jogeshwari Vidhan Sabha
Rohit Pawar : पुढच्या बारा दिवसात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार; आमदार रोहित पवारांचा बावनकुळेंवर निशाणा

त्यांनी सांगितले, कि मंगळवारी रात्री अनंत नर हे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते घेऊन आले आणि शिवीगाळ केली. त्यांच्या कार्यकर्त्यांने महिलांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता महिलांचा व्हिडिओ काढणाऱ्यांनी त्या महिलांचे कपडे फाडले. तसेच काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. मुलीचा विनयभंग केला; असा गंभीर आरोप वायकर यांनी यावेळी केला. अनंत नर याचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबाठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल; अशी खुलेआम धमकी जाहीर सभेत दिली असाही आरोप त्यांनी केला.

Jogeshwari Vidhan Sabha
Alibag News : जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रचार; शेकापच्या उमेदवारावर आचारसंहिता भंगचा गुन्हा

उबाठा उमेदवार अनंत नर यांचा सुनेचा छळ केल्याचे व्हिडिओ क्लिप आहेत. घरगुती हिंसा, सुनेला जाळण्याचा प्रयत्न, भावाच्या बायकोला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न अनंत नरने केला होता. जोगेश्वरीत अशी गुंडगिरी असेल तर आम्ही निवडणूक लढवू शकत नाही. इथे सुरक्षित वातावरण नाही. पोलिस आणि निवडणूक आयोगाने या घटनेसंदर्भात कारवाई करावी; अशी मागणी वायकर यांनी केली आहे. याप्रकरणी अमित पेडणेकर, विलास जाधव, मंदार मोरे, बाळा सावंत, संदीप कोठारकर आणि एका अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com