Rohit Pawar : पुढच्या बारा दिवसात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार; आमदार रोहित पवारांचा बावनकुळेंवर निशाणा

Bhandara News : मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नसून कार्यकर्ता म्हणून मविआसाठी फिरत आहे. सर्व निर्णय शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी घेतील
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
:  भाजप आता सत्तेत येत नाही. पुढच्या बारा दिवसात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्र्याची चर्चा होणार असं त्यांना वाटतं असेल, याचा अर्थ बावनकुळे साहेबांनी हार मानलेली आहे. त्यांनी काय बोलालं यापेक्षा महाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही याबाबत निर्णय घेऊ. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नसून कार्यकर्ता म्हणून मविआसाठी फिरत आहे. सर्व निर्णय शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी घेतील; असा टोला रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. 

भाजपचे (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीमध्ये रोहित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह बारा- बारा नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

Bhandara News
Akola News : अकोल्यात तीन बंडखोर उमेदवारांचे बॅनर फाडले; पोलिसात दिली तक्रार


महाविकास आघाडीच्या १८० जागा येतील
छगन भुजबळांची ती भूमिका असेल. शरद पवारांचीही भूमिका अशीच आहे; ज्यांचं कुणाचं काही चुकलं असेल, ज्या गोष्टीवर या राज्यावर अन्याय झाला असेल. त्यावर चर्चा व्हावी. जर कोणी नेते भाजपसोबत गेले त्यांची इच्छा असेल की चर्चा व्हावी, तर होऊन जाऊ देतं समोरासमोर चर्चा. कोण काय बोलतात बघू. कोण काय काय बोलतोय कुठे कुठे पाणी मुरलंय. हे त्या ठिकाणी चर्चा होईल. राज्यात महाविकास आघाडीच्या १६७ ते १८० जागा येतील; असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त करतानाच छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरही चांगलाच टोला हाणला.

Bhandara News
Bribe Case : दोन हजारांची लाच घेताना हवालदारासह एकजण ताब्यात

भाजपची संगत असल्यामुळे सरकारमध्ये बेशिस्तपणा आला

इंग्लिशचा विषय तसा कुठे येत नाही. पण, सहा लाख कोटीच बजेट मांडण्यासाठी लॉजिक नक्कीच लागतं. जेव्हा काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत अजित दादा होते. तेव्हा बजेटबद्दल सांगताना ते आम्हाला सांगत होते की, आपल्याला काही बाबतीत राहावं लागतं, काही निर्णय आपल्याला स्ट्रीक्ट रहावं लागतं. आयुष्याचा विचार करावा लागतो. चांगल्या प्रकारे रहाव लागत. पण आता भाजपसोबत गेल्यानंतर शिस्तपणा त्यांच्यात राहिलेला नाही. बेशिस्तपणा हा त्यांच्या ट्रेजेरीमध्ये आलेला आहे. अनेकवेळा बजेट त्यांनी मांडला असला तरी हा फरक इथे का जाणवतो. भाजपची संगत असल्यामुळे फारच जास्त बेशिस्तपणा सरकारमध्ये आला असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

अजित दादा आता भाजप बरोबर गेले त्यामुळे भाजपसोबत गेल्यानंतर ते आज काहीही बोलतील. माझी एकच विनंती आहे. गौतम अदानी साहेबांना पुढे करा. पत्रकारांना विचारू द्या, खर काय होतं. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल कशाला हवेत गोळ्या मारायच्या?. पहाटेच्या शपथवधीच्या बैठकीला गौतम अदानीसह शरद पवार उपस्थित होते, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं; त्यावर रोहित पवार बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com