15 सेकंदासाठी बांगलादेशाची सीमा खुली करा; नवनीत राणा अशा का म्हणाल्या?
navneet rana on bangladesh saam tv

Maharashtra Politics : 15 सेकंदासाठी बांगलादेशाची सीमा खुली करा; नवनीत राणा अशा का म्हणाल्या?

navneet rana on bangladesh : बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराच्या घटनेवरून नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.15 सेकंदासाठी बांगलादेशाची सीमा खुली करा, असे आव्हान नवनीत राणा यांनी दिलं.
Published on

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावती : बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात राज्यभरातील विविध भागात निषेध मोर्चांचं आयोजन करण्यात आलं. या घटनेच्या विरोधात अमरावतीत देखील मोर्चा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या सभेत भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी बांगलादेशाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. 15 सेकंदासाठी बांगलादेशाची सीमा खुली करा, असं आव्हान नवनीत राणा यांना दिले.

बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमरावतीच्या राजकमल चौकात ठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटना, भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी विविध फलकाच्या माध्यमातून हिंदू समाजावरील अत्याचार कसे होतात याचा विरोध आणि निषेध करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत भाजप नेत्या नवनीत राणा यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.

15 सेकंदासाठी बांगलादेशाची सीमा खुली करा; नवनीत राणा अशा का म्हणाल्या?
Sambhajinagar Crime : दुचाकीचा धक्का लागल्याने वाद; टोळक्याकडून कुटुंबावर हल्ला, दोनजण जखमी 

'बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाही. तेथे अत्याचार होत आहेत. तिथं वकील सुद्धा देण्यात येत नाही. त्यामुळे बांगलादेश सरकारने 15 सेकंदासाठी त्यांची बॉर्डर उघडावी. या 15 सेकंदात त्यांची पात्रता दाखवून देऊ, अशा शब्दात भाजप नेत्या नवनीत राणा यांनी बांगलादेशला इशारा दिला. 'आमच्या भारत देशात एक वाघ जिवंत आहे. हा वाघ बांगलादेशची सफाई करेल, असा दम नवनीत राणा यांनी यावेळी भरला. जोरदार घोषणा आणि आक्रमक पद्धतीने हा मोर्चा करण्यात आला. अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा पार पडला.

15 सेकंदासाठी बांगलादेशाची सीमा खुली करा; नवनीत राणा अशा का म्हणाल्या?
Khadakpada Police : इराणी वस्तीत पोलीसांवर दगडफेक; २५ जणांविरोधात गुन्हा दाखल, चौघांना अटक

डोंबिवलीतही बांगलादेशातील अत्याचाराचे पडसाद

बांगलादेशामध्ये हिंदू होणाऱ्या अत्याचाराचे तीव्र पडसाद राज्यातील विविध ठिकाणी उमटताना दिसत आहेत. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवलीत फडके रोड, आप्पा दातार चौकात शेकडो डोंबिवलीकर एकवटले. हातात निषेधाचे बॅनर घेऊन डोंबिवलीकरांनी आंदोलन केलं.

15 सेकंदासाठी बांगलादेशाची सीमा खुली करा; नवनीत राणा अशा का म्हणाल्या?
Bangladesh Clashes: शेख हसीनांचा राजीनामा, बांगलादेश सोडून भारतात; बॉर्डरवर BSF अलर्ट

मानवी साखळी करत निषेध नोंदवला. बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवला . बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असताना कोणताही देश पुढे येत नाहीये त्यामुळे हिंदुनीच हिंदूंच्या पाठीशी उभे राहावे ,आम्ही पीडित हिंदूसोबत आम्ही उभे आहोत, असे यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com